Yawal Accident Saam tv
महाराष्ट्र

Yawal Accident : चढावावर अनियंत्रित ट्रॅक्टर थेट दरीत कोसळले; चालकाचा मृत्यू

Jalgaon News : चढावावर जात असताना समोरून एक वाहन आल्यामुळे चालकाने ट्रॅक्टरचा स्पीड कमी केला. चढावावर गती कमी केल्यामुळे ट्रॅक्टर अनियंत्रित झाले. यानंतर चढावावरून मागच्या दिशेने रिव्हर्स झाले

Rajesh Sonwane

यावल (जळगाव) : बांधकामासाठी आवश्यक असलेली खडी भरून नेणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. खडीने भरलेला ट्रॅक्टर चढावावर गती कमी झाल्याने उलट्या दिशेने येऊ लागले. यामुळे ट्रॅक्टरवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर थेट दरीत कोसळले. यात चालक दाबला गेल्याने यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना यावल  तालुक्यातील अंजाळे गावाजवळ घडला आहे. 

भुसावळकडून यावलकडे जात असताना हा भीषण अपघात घडला आहे. यात यावल तालुक्यातील कठोर येथील छगन गोमा सपकाळे (वय ४५) असे मृत झालेल्या चालकाचे नाव आहे. भुसावळकडून यावलकडे ट्रॅक्टरमध्ये खडी भरून ट्रॅक्टर चालक छगन सपकाळे हे निघाले होते. भुसावळ- यावल रस्त्यावरील अंजाळे गावाजवळ मोर नदीच्या पुढे अंजाळे गावाच्या बसस्थानकाजवळ रस्त्याचा चढाव आहे. 

चढावावर ट्रॅक्टर रिव्हर्स आल्याने नियंत्रण सुटले 

चढावावर जात असताना समोरून एक वाहन आल्यामुळे चालकाने ट्रॅक्टरचा स्पीड कमी केला. चढावावर गती कमी केल्यामुळे ट्रॅक्टर अनियंत्रित झाले. यानंतर चढावावरून मागच्या दिशेने रिव्हर्स झाले. त्यावर नियंत्रण मिळविणे शक्य न झाल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत कोसळले. या अपघातात ट्रक्टर चालक सपकाळे हे ट्रॅक्टर खाली दाबले गेले.

तरुणांनी चालकाला बाहेर काढले पण.. 
दरम्यान अपघाताची माहिती अंजाळे गावात समजताच गावातील काही तरुणांनी ट्रॅक्टरच्या धुड बाजूला उचलून त्याखाली दबलेल्या चालकास बाहेर काढले. यानंतर भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात उपचारर्थ दाखल केले होते. मात्र शनिवारी उपचारादरम्यान छगन सपकाळे यांचा मृत्यू झाला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

SCROLL FOR NEXT