Reel-making obsession turns tragic in Jalgaon; two youths killed after being hit by a speeding train. saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: कानाला हेडफोन अन् डोक्यात रील बनवण्याचं खूळ; रेल्वेच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू

Reel-Making Turns Tragic: जळगावमध्ये एक धक्कादायक दुर्घटना घडली आहे. रेल्वे रुळांवर सोशल मीडिया रील शूट करताना दोन तरुणांना ट्रेनची धडक बसली. यात दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागलाय.

Bharat Jadhav

  • अहमदाबाद एक्सप्रेसच्या धडकेत तरुणांचा मृत्यू

  • दोन्ही तरुण कानात हेडफोन लावून रुळावर बसून रील बनवत होते.

  • पाळधी पोलीस घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांच्याकडून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

सोशल मीडियावर रील स्टार होण्यासाठी अनेकजण आटापीटा करत असतात. वेगवेगळ्या प्रकारे रिल बनवून प्रसिद्ध होण्याच्या हव्यासापोटी दोन तरुणांना जीव गमावावा लागलाय. जळगावमधील पाळधी गावात दोन तरुणांना रेल्वे रुळावर बसून रील बनवणं महागात पडलं आहे. रेल्वेच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू झालाय.

हर्षल नन्नवरे आणि प्रशांत खैरनार असे मृत तरुणांची नावे आहेत. ते दोघेही १८ वर्षाचे होते. ते पाळधी गावात रेल्वे गेट जवळील भागात राहत होते. पाळधी येथील रेल्वे गेटजवळ ते रेल्वे रुळावरून बसून रिल बनवत होते. मात्र रिल बनवण्याच्या वेडापायी त्यांचा जीव गेलाय.

पाळधी येथील रेल्वे गेटजवळ रिल बनवत असताना त्यांना अहमदाबाद एक्सप्रेसच्या धडक बसली. यात दोघांचा मृत्यू झाला. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघेही कानात हेडफोन लावून रुळावर बसून रिल बनवत होते. त्याच दरम्यान ही दुर्घटना घडली. पाळधी पोलीस घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांच्याकडून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toll Collection : टोल प्लाझावरील वाहनांच्या लांबच लांब रांगा होणार कमी? केंद्र सरकारकडून फास्टॅगनंतर नवीन MLFF प्रणाली सुरू

Knife Attack: जामा मस्जिद पोलीस ठाण्यात रक्तरंजित थरार! चाकू हल्ल्यात ५ पोलीस कर्मचारी जखमी, चेहरा आणि मानेवर सपासप वार

Gold Investment : घरातलं सोनं न विकताही मिळवा दरवर्षी पैसे! काय आहे ही भन्नाट गोल्ड लीजिंग स्कीम?

Maharashtra News Live Update: भिवंडी MMR मधील सर्वाधिक प्रदूषित शहर

एकनाथ शिंदे म्हणाले आण रे पिस्तूल, मी माझ्या डोक्यात गोळ्या घालतो; आमदाराच्या दाव्याने राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT