Jalgaon Crime Saam Tv
महाराष्ट्र

Jalgaon: धावत्या ट्रेनवर सशस्त्र दरोडा, चाकूचा धाक दाखवत प्रवाशांना लुटलं; लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

Jalgaon Crime: जळगावमध्ये धावत्या ट्रेनवर दरोडा टाकण्यात आला. प्रवाशांना मारहाण करत आणि चाकूचा धाकवत प्रवाशांना लुटण्यात आले.

Priya More
  • जळगावमध्ये धावत्या ट्रेनवर दरोडा

  • चाकूचा धाक दाखवून प्रवाशांना लुटले

  • भुसावळनजीक हडपसर- रीवा एक्स्प्रेसमध्ये घडली घटना

  • प्रवाशांना मारहाण करून ७१५० रुपयांची लूट

संजय महाजन जळगाव

जळगावमध्ये धावत्या ट्रेनवर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. भुसावळनजीक हडपसर -रीवा एक्स्प्रेसमध्ये दरोड्याची ही घटना घडली. चौघांनी धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांना चाकूचा धाक दाखवत लुटले. आधी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर चाकूचा धाक दाखवत प्रवाशांना लुटले. त्याच्याकडील पैसे घेऊन दरोडेखोर फरार झाले. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. रेल्वे पोलिस सध्या या दरोड्याचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ रेल्वे स्थानक सुटल्यानंतर अवघ्या १० ते १५ मिनिटांत हडपसर -रीवा एक्स्प्रेसवर दरोडा टाकण्यात आला. जनरल डब्यात दोन तृतीयपंथीयांसह चार जणांनी घुसून प्रवाशांना शिवीगाळ आणि मारहाण केली. चाकूचा धाक दाखवत दोन प्रवाशांकडून तब्बल ७ हजार १५० रुपयांची रोकड हिसकावून घेतली. त्यानंतर आरोपींनी रेल्वेची चेन ओढून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले.

घटनेची माहिती मिळताच अकोला रेल्वे पोलिसांनी ट्रेन थांबवून तक्रार नोंदवली. त्यानंतर शून्य क्रमांकाने दाखल झालेला गुन्हा भुसावळ रेल्वे पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात. या दोराडा प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गफ्फार शेख करीत आहेत. अशाप्रकारे धावत्या ट्रेनवर दरोडा टाकला जात असल्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT