दसऱ्याआधी सोन्याचे दर वाढले
प्रति तोळा १ लाख २१ हजार ५०० रुपये
सोन्यासह चांदीच्या दरातदेखील वाढ
दसऱ्याआधी सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. दसऱ्याच्या आदल्या दिवशी सोन्याचे दर १०५० रुपयांनी वाढले आहे.जळगाव म्हणजे सुवर्णनगरीतील नवीन दर जाहीर झाले आहेत. गेल्या ४-५ दिवसांपासून सोन्याचे दर वाढत आहेत. आज सोन्याचे दर १ लाख २१ हजार ५५० रुपये झाले आहेत.
सोन्यासह चांदीचेही दर वाढले (Gold Silver Rate Hike)
जळगावच्या सराफा बाजारपेठेत नेहमी सोने खरेदी करण्यासाठी गर्दी असते. दरम्यान, आज दतर या दरात खूप वाढ झाली आहे. सोन्यासह चांदीचे दरदेखील वाढले आहे. १ किलो चांदीचे दर १ लाख ५१ हजार रुपये आहे. ऐन सणासुदीच्या काळात सोन्याचे दर वाढत आहे. दसरा झाल्यानंतर लगेचच दिवाळीदेखील आहे. या दोन्ही सणांना सोने खरेदी करतात. मात्र, आता सोन्याचे वाढलेले दर सर्वसामान्यांना परवडणारे नाही. त्यामुळे सोने आणि चांदी खरेदी करावी नाही असा प्रश्न पडला आहे.
जागतिक पातळीवरील परिस्थिती, अमेरिकन फेडरल बँकेचे धोरण तसेच विविध देशांकडून वाढलेली सोन्याची खरेदी यामुळे हे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यापुढे वाढत राहणार असल्याचे सांगितले जात आहेत. दरम्यान, सोन्याचे दर वाढत असले तरीही सोनं खरेदी करणे हे सर्वसामान्यांना परवडणारे नाही. त्यामुळे सर्वसामान्यांनी सोने खरेदी करण्याकडे पाठ फिरवली आहे.
८ दिवसात ८००० रुपयांची वाढ
उद्या अनेकजण सोने खरेदी करतात. साडेतीन मूहूर्तांपैकी एक मूहूर्त साधून सोनं खरेदी करण्याकडे ग्राहकांची ओढ असते. मात्र, यावर्षी सोने खरेदी कमी होईल, असं सांगण्यात येत आहे. सोन्याचे दर जवळपास १ लाख २१ हजार रुपये झाले आहेत. मागील ८ दिवसात हे दर ८००० रुपयांनी वाढले आहेत. याचसोबत चांदीचे दरदेखील वाढले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.