JALGAON SHOCKER: MOTHER MARRIES BOYFRIEND DAYS BEFORE DAUGHTER'S ENGAGEMENT, HUSBAND APPROACHES POLICE Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon : मुलीचा साखरपुडा काही दिवसांवर, लग्न घरातून पळून गेली आई; बॉयफ्रेंडसोबत थाटला संसार

Jalgaon Jamner : जळगावातील जामनेर येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीचा साखरपुडा काही दिवसांवर असताना आईने प्रियकरासोबत लग्न केले. पतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Alisha Khedekar

  • जळगावच्या जामनेरमधील धक्कादायक प्रकार

  • मुलीच्या साखरपुड्यापुर्वी आईने प्रियकरासोबत लग्न केले.

  • प्रियकराच्या स्टेटसमुळे लागणीची बातमी व्हायरल

  • पतीने जामनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली

संजय महाजन, जळगाव

Jalgaon Women Love Affair News जळगावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलीचा साखरपुडा तोंडावर असताना आईने स्वतःच बॉयफ्रेंडशी लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. इतकचं नाही तर महिलेच्या बॉयफ्रेंडने लग्न केल्यावर त्याचा स्टेटसही ठेवण्यात आला होता. याप्रकरणी महिलेच्या पहिल्या पतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर शहरातील एका भागात राहणाऱ्या कुटुंबात येत्या गुरुवारी मुलीचा साखरपुडा होणार होता. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी घरात लगबग सुरू होती. नातेवाईकांचे येणे-जाणे वाढले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी घरातील महिलेने कोणालाही कोणतीही माहिती न देता अचानक घर सोडले. कुटुंबीयांनी तिचा सगळीकडे शोध घेतला, मात्र तिचा काहीच पत्ता लागला नाही.

दरम्यान, दुसऱ्याच दिवशी संबंधित महिलेच्या प्रियकराने आपल्या मोबाईलवरील स्टेटसवर दोघांनी लग्न केल्याचे फोटो अपलोड केले. हे फोटो पाहताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. मुलीच्या साखरपुड्याच्या तयारीत असलेल्या कुटुंबावर या घटनेमुळे पायाखालची जमीन सरकली. पत्नीने प्रियकरासोबत लग्न केल्याचे फोटो पाहून हतबल झालेला पती थेट जामनेर पोलीस ठाण्यात पोहोचला.

मुलीचा साखरपुडा काही दिवसांवर आला असताना समाजात आमची बदनामी होत असल्याची तक्रार त्याने पोलिसांसमोर मांडली. तसेच पत्नी आणि तिच्या प्रियकराला मोबाईलवरील लग्नाचे स्टेटस काढायला सांगा अशी विनंतीही त्याने केली.पतीची व्यथा ऐकल्यानंतर पोलिसांनी तत्काळ संबंधित प्रियकराला पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. यावेळी त्याला योग्य ती समज देण्यात आली. या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना वडगाव मावळ न्यायालयाने दिली चार दिवसाची पोलीस कोठडी

विधान भवनाला पुन्हा धमकीचा ई-मेल; मुंबईतील तीन महत्त्वाची ठिकाणं बॉम्बनं उडवण्याची धमकी

Hair Care: शायनी आणि सिल्की केस पाहिजेत? मग केस धुण्याच्या २ तासआधी लावा हे घरी तयार केलेलं तेल

भारतातील ‘सायलेंट विलेज’ कुठे आहे? निम्म्याहून अधिक लोकांना ऐकू अन् बोलताही येईना

५० प्रवाशांना घेऊन निघालेल्या एसटी बसचे चाक निखळले; अर्धा किमी पुढे गेल्यानंतर दुसरा टायरही फुटला, VIDEO

SCROLL FOR NEXT