Raver Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Raver Heavy Rain : ढगफुटी सदृश्‍य पाऊस; रावेरमध्‍ये पुरात दोघांचा मृत्यू, एक बेपत्ता

ढगफुटी सदृश्‍य पाऊस; रावेरमध्‍ये पुरात दोघांचा मृत्यू, एक बेपत्ता

साम टिव्ही ब्युरो

रावेर (जळगाव) : महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये बुधवारी सायंकाळी झालेल्या (Heavy Rain) ढगफुटी सदृश्‍य पावसामुळे (Raver) रावेर तालुक्यातील जवळपास सर्वच नदी नाल्यांना पूर आला. या पुरात तालुक्यातील दोघांचा बुडून मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता आहे. या अचानक आलेल्या पुरात २० जनावरे वाहून गेले असून १४५ घरांचे नुकसान झाले आहे. (Breaking Marathi News)

रावेर तालुक्यातील मोरव्हाल येथील बळीराम रायसिंग बारेला (वय ४५) हा शेतमजूर किराणा घेण्यासाठी गेला होता. या दरम्‍यान अभोडा नाल्याला आलेल्या पुरात तो वाहून गेला. आज सकाळी त्याचा मृतदेह सापडला. तर शहरातील फुकटपुरा भागातील शेख इकबाल शेख सत्तार (वय ५६) हे नागझिरी नाल्याशेजारी असलेल्‍या घरात पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने घराची भिंत पडून आणि पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.

एक रात्रीपासून बेपत्‍ता

रावेरचे माजी उपनगराध्यक्ष आणि रावेर शिक्षण संवर्धक संघाचे संचालक सुधीर गोपाळ पाटील (वय ४८) हे बुधवारी (५ जुलै) रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांच्या जुन्या घरातून अवघे २०० मीटर अंतरावर असलेल्या नवीन घरात येत होते. यावेळी त्‍यांची मोटरसायकल घसरल्याने नागझिरी नाल्याच्या पुराच्या पाण्यात वाहून गेले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळपासून त्यांचे नातेवाईक आणि प्रशासनाने युद्ध पातळीवर शोध कार्य सुरू केले असून सायंकाळी उशिरापर्यंत ते आढळून आले नाहीत. त्यांची मोटार सायकल नाल्यात आढळून आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pineapple Cuting Tips : घरच्या घरी अननस कसा कापायचा?

Shocking News : धक्कादायक! रिक्षाचालकाचं भयंकर कृत्य, नववीतील विद्यार्थ्यावर नेलकटरनं हल्ला

Palghar Tourism : वीकेंडला फिरायला परफेक्ट डेस्टिनेशन, डहाणू ट्रेन पकडा अन् थेट पोहचा 'या' लोकेशनला

Navi Mumbai: ख्रिसमसपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानसेवा; जाणून घ्या उड्डाणांचे वेळापत्रक अन् संपूर्ण ऑपरेशन

Maharashtra Live News Update: गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथे शक्ती प्रदर्शन करीत काँग्रेसने भरला नगराध्यक्ष पदाचा अर्ज

SCROLL FOR NEXT