Political Shock in Jalgaon Saam Tv News
महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का; महिला नेत्याकडून राजीनामा, राष्ट्रवादी अजित पवारांची देणार साथ

Political Shock in Jalgaon: जळगावमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; प्रतिभा शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. माणिकराव कोकाटे यांनी अजित पवार गटाची ताकद प्रत्यक्षात दिसून येईल, असं सांगितलं.

Bhagyashree Kamble

  • जळगावमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; प्रतिभा शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा दिला.

  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

  • माणिकराव कोकाटे यांनी अजित पवार गटाची ताकद प्रत्यक्षात दिसून येईल, असं सांगितलं.

  • निवडणुका स्वबळावर की महायुतीसोबत लढायच्या, याबाबतचा अंतिम निर्णय पक्ष नेते घेणार.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जळगावमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

आज जळगावमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा मोठा सोहळा होत आहे. या सोहळ्यात मंत्री माणिकराव कोकाटे यांचीही उपस्थिती असणार आहे. माणिकराव कोकाटे यांनी प्रतिभा शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश होणार असल्याचं निश्चित केलं. हा पक्षप्रवेश सोहळा भव्य होणार असून, अजित पवार गटातील मुख्य नेतेही उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

दररोज जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट बळकट होत असून, ती ताकद आम्ही प्रत्यक्षात उतरवणार आहोत, असं माणिकराव कोकाटे म्हणाले.

'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अपक्ष की युती, हा निर्णय पक्षस्तरावर घेतला जाईल. गिरीश महाजन यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत; मात्र त्यांनी त्यांच्या पक्षाचा विचार करायला हवा. स्वबळावर की महायुती म्हणून लढायचे, याबाबत अंतिम निर्णय आमचे नेते एकत्र बसून नीतीनुसार घेतील आणि त्याप्रमाणे आम्ही कार्य करू', असंही माणिकराव कोकाटे म्हणाले.

काँग्रेसला मोठा धक्का

गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या प्रतिभा शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिला. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. त्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा सोपवला. राजीनामा पत्रात त्यांनी कोणताच उल्लेख केलेला नाही. मात्र, पक्षाला सोडचिठ्ठी देत त्यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली. काँग्रेसमधून बाहेर पडण्यास जिल्हास्तरापासून राज्यस्तरावरील सगळेच लोक जबाबदार असल्याचा खळबळजनक आरोप शिंदे यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Pepper : दररोज काळीमिरी खाल्ल्याने आरोग्याला होतात 'हे' भन्नाट फायदे

Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला खोटा? अहवालात नेमकं काय?

Face Care Tips: ग्लोइंग त्वचेसाठी बेसन आणि हळदीचा पॅक लावताय? थांबा, होतील 'हे' दुष्परिणाम

Kolhapur News : कोल्हापुरात इमारतीचा स्लॅब कोसळला; अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Yellow Nails: नखांचा रंग पिवळा झालाय? वेळीच व्हा सावध, असू शकतो 'हा' गंभीर आजार

SCROLL FOR NEXT