Jalgaon News Lighting Strike Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: वीज पडून तरूणाचा मृत्यू; घरांची पत्रेही उडाली

वीज पडून तरूणाचा मृत्यू; घरांची पत्रेही उडाली

साम टिव्ही ब्युरो

पारोळा (जळगाव) : जिल्‍ह्यात रविवारी वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा बसला. यात दगडी सबगव्हाण (ता. पारोळा) येथे रविवारी (ता. ४) दुपारी साडेबाराच्या सुमारास झालेल्या जोरदार वादळी पावसात (Lighting Strike) वीज पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. (Breaking Marathi News)

सुनील आबाजी भिल (वय ३२) असे मृताचे नाव आहे. सुनील हा सबगव्हाण येथील शेतकरी भाऊसाहेब गोपीचंद पाटील यांच्याकडे सालदार म्हणून कामाला आहे. दुपारी सुरू झालेल्या वादळी (Parola) पावसामुळे तो शेतात असताना लिंबाच्या झाडाखाली आडोशाला उभा राहिला. दुर्दैवाने त्याच झाडावर वीज कोसळल्याने विजेच्या धक्क्याने सुनीलचा जागीच मृत्यू झाला.

घरांची पत्रेही उडाली

दरम्यान जोरदार वादळामुळे गावातीलच वाल्मिक शंकर भिल व जोगी यांच्यासह पाच घरांची पत्रे उडून गेली. वादळाचा जोर अधिक असल्याने अनेक भागातील झाडे उन्मळून पडली. यामुळे मोठे नुकसान देखील झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actress : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, आमिर खानच्या सिनेमात वर्णी

Navi Mumbai: नवी मुंबईत भाजपचा स्वबळाचा नारा? महापौर आमचाच होणार, गणेश नाईकांचा दावा

Sunday Mega Block : रविवारी मुंबईकरांचे 'मेगा'हाल होणार, ३ मार्गावर मेगाब्लॉक, जाणून घ्या रेल्वेचे वेळापत्रक

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप

Nagarparishad Election: बारामती, फलटण, अंबरनाथसह २३ नगरपरिषद- नगरपंचायतीसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; उद्या निकाल

SCROLL FOR NEXT