Jalgaon Accident News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident News: कार दुभाजकावर आदळून गुजरातमधील दोघांचा मृत्यू; एक जखमी

Parola News : कारने २० नोव्हेंबरला भुसावळ येथे कंपनीच्या कामानिमित्त आले होते. कंपनीचे काम संपवून ते दुसऱ्या दिवशी पहाटे परतीला निघाले

साम टिव्ही ब्युरो

पारोळा (जळगाव) : भरधाव कार दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात गुजरात राज्यातील दोन जणांचा (Accident) जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना मध्यरात्री तीनच्या सुमारास पारोळा (Parola) तालुक्यातील सारर्वे गावाजवळ घडली. (Breaking marathi News)

गुजरात राज्यातील अजय नरेंद्र कोकजे (वय ६२, रा. बडोदा, गुजरात), चेतन ताखासिंग राज (वय २७, रा. भानपुरा, ता. अकलाव जि. आनंद गुजरात), तखासिंग उदयसिंग राज वय ६० रा भानपुरा ता अकलाव, जि. आनंद गुजरात) हे कारने २० नोव्हेंबरला भुसावळ (Bhusawal) येथे कंपनीच्या कामानिमित्त आले होते. कंपनीचे काम संपवून ते दुसऱ्या दिवशी पहाटे परतीला निघाले. दरम्यान सारवे (ता. पारोळा) गावानजीक राष्ट्रीय महामार्गावर सकाळी सव्वातीनच्या सुमारास रस्त्याचा अंदाज न आल्याने चालकाचा करवरील ताबा सुटल्याने भरधाव कर दुभाजकावर जोरदार आदळली. यात चालक अजय नरेंद्र कोकजे व चेतन ताखासिंग राज यांचा जागीच मृत्यू झाला. तर तखासिंग उदयसिंग राज हे गंभीर जखमी झाले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जोरदार आवाजाने गावकरी धावले 

कारची दुभाजकाला धडक झाल्याने जोरदार आवाज झाला. यामुळे घटनास्थळी गावातील काही लोक धावले. रुग्णवाहिका चालक ईश्वर ठाकूर, रोशन पाटील, यश ठाकूर, अमोल महाजन, शरद पाटील, यश गोसावी यांनी मृतदेह गाडीतून बाहेर काढले व जखमीला खासगी रुग्णालयात दाखल केले. गाडीचा वेग जास्त असल्याने दुभाजकावर इतक्या जोराने आदळली की कारमधील दोघेही एअर बॅग उघडूनही दोघांचे प्राण वाचू शकले नाही. याबाबत पारोळा पोलिसात श्रीरंग अजय कोकजे यांच्या फिर्यादीवरून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक राजू जाधव तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महिला असुरक्षित,बेकारी वाढतेय- उद्धव ठाकरे

Mental Health: मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश

Health: शरीरासाठी आवश्यक पदार्थ कोणकोणते? जाणून घ्या एका क्लिकवर

Abhijeet Kelkar: 'धुरळा उडाला, सूर्य पुन्हा एकदा तळपला...' देवेंद्र फडणवीस यांच्या विजयानंतर मराठी अभिनेत्याची जबरदस्त पोस्ट, म्हणाला...

Amravati Assembly Election 2024: बच्चू कडूंना पराभवाचा धक्का, अमरावतीच्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT