Parola Accident Saam tv
महाराष्ट्र

Parola Accident : दुचाकी घसरताच मायलेकाच्या अंगावरून गेले टँकर; एक वर्षाच्या चिमुकल्यासह आईचा मृत्यू

jalgaon News : लग्न सोहळा पार पाडल्यानंतर मित्राची भेट घेऊन ते एरंडोल येथे मामाला भेटण्यासाठी मार्गस्थ झाले होते.

साम टिव्ही ब्युरो

पारोळा (जळगाव) : मित्राचे लग्न असल्याने पती- पत्नी सोबत आले होते. लग्न सोहळा आटोपल्यानंतर दुचाकीने एरंडोल (Erandol) येथे मामाची भेट घेण्यासाठी मार्गस्थ झाले. मात्र या परिवारावर रस्त्यातच काळाने घाला घातला. महामार्गावर निघालेल्या खडीमुळे दुचाकी घसरली. यामुळे मागे बसलेली पत्नी व मुलगा खाली (Accident) पडले. याचवेळी मागून येणाऱ्या टँकरखाली ते चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. (Breaking Marathi News)

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील कुकावल (ता. शहादा) येथील गुरांचे डॉ. प्रतीक सुनील पाटील (वय ३०) हे पत्नी पूनम पाटील (वय २४) व एक वर्षाचा मुलगा अगस्य पाटील पारोळा (Parola) तालुक्यातील चिखलोड येथे मित्राच्या लग्नासाठी दुचाकीने आले होते. (Marriage) लग्न सोहळा पार पाडल्यानंतर मित्राची भेट घेऊन ते एरंडोल येथे मामाला भेटण्यासाठी मार्गस्थ झाले होते. दरम्यान दुपारी तीनच्या सुमारास महामार्गावरील सारवे, बाभळेनाग फाट्या दरम्यान डांबर निघून खडी उखळली असल्याने दुचाकी अचानक घसरल्याने ते रस्त्यावर पडले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याचवेळी मागून येणाऱ्या टँकरचे चाक पूनम व अगस्त यांच्या अंगावरून गेले. यात दोघा मायलेकांचा जागीच मृत्यू झाला. तर डॉ. प्रतीक विरुद्ध दिशेला पडल्याने ते बचावले असून जखमी झाले आहेत. खराब रस्त्यामुळे दुचाकी स्लीप झाल्याने ही दुर्दैवी घटना त्यांच्या डोळ्यादेखत झाली. त्यामुळे ते भयभीत झाले होते. जखमी व मृतांना तत्काळ रुग्णवाहिकेतून पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत उशिरापर्यंत पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमधील निवासी डॉक्टरांकडून संप

Mobile Recharge: जिओ अन् एअरटेलपेक्षा खास प्लॅन, ३५० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० दिवसांसाठी दररोज डेटा

Shocking: बहिणीच्या दिराने पळवून नेलं, अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंध; गरोदर पीडितेला रेल्वे स्टेशनवर सोडून पळाला

Anil Ambani : अंबानींवर ईडीची मोठी कारवाई, ३००० कोटींची संपत्ती जप्त, फ्लॅट, प्लॉट अन् ऑफिसला कुलूप

'६,५०० रूपयातील साडेचार मॅडमच्या खात्यात पाठव'; शेतकऱ्याच्या अनुदानावर शासकीय कर्मचाऱ्याचा डोळा, Audio क्लिप व्हायरल

SCROLL FOR NEXT