Jalgaon Pachora News Saam tv
महाराष्ट्र

Pachora News : लग्‍न होऊन झाले तीनच महिने; विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

लग्‍न होवून झाले तीनच महिने; विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

साम टिव्ही ब्युरो

पाचोरा (जळगाव) : पाचोरा येथील गोविंदनगरात वास्तव्यास असलेल्या १९ वर्षीय विवाहितेने घराच्या मागील बाजूस असलेल्या (Pachora) विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (१३ जुलै) सकाळी घडली. याप्रकरणी पोलिसांनी (Police) अकस्मात मृत्यूची नोंद केली असली, तरी मृत विवाहितेच्या माहेरच्यांनी सासरच्या जाचाला कंटाळून काजलने आत्महत्या केल्याची तक्रार पोलिसात दिली आहे. (Maharashtra News)

कुऱ्हाड तांडा (ता. पाचोरा) येथील राहुल चव्हाण याचा विवाह (Marriage) लिहा तांडा (ता. जामनेर) येथील काजल राठोड (वय १९) हिच्याशी तीन महिन्यापूर्वी झाला होता. लग्नानंतर महिनाभर सासरच्यांकडून चांगली वागणूक मिळाली. परंतु मृत काजलची आजल सासू सुग्राबाई चव्हाण, सासू मुक्ताबाई चव्हाण व चुलत सासू पार्वताबाई चव्हाण या संगनमताने किरकोळ कारणावरून काजलला टोचून बोलून तिचा मानसिक छळ करत. त्यामुळे घरात भांडणे व वादविवाद होत असत.

वेगळे रहायला आले अन्‌

उगीच रोज वादविवाद नको म्हणून गेल्या १० जुलैला राहुल चव्हाण याने पाचोरा येथील गोविंदनगर भागात भाड्याची खोली घेऊन तो पत्नीसह राहावयास आला होता. परंतु येथे राहायला आल्यानंतर अवघ्या तिसऱ्या दिवशी काजलने घराच्या मागील बाजूस असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांनी काजलला तातळीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. परंतु मृत काजलच्या माहेरच्यांनी ग्रामीण रुग्णालयात मन हेलावणारा आक्रोश करत सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून काजलने आत्महत्या केल्याची तक्रार केली. त्यामुळे सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे पोलिसांचे काम सुरू होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक; मतदान प्रक्रियेला सुरुवात

Namo Shetkari Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नमो शेतकरी योजनेचे ₹२००० जमा, तुमच्या खात्यात पैसे आले का? असं करा चेक

Pitru Paksha 2025 : पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये?

Crime News : पुण्यातील गँगवॉरची पनवेलमध्ये पुनरावृत्ती, गोल्डन मॅनचा राजकुमार म्हात्रेवर जीवघेणा हल्ला

Vice President Election : कुणाचा गेम होणार? मतदानाआधीच ३ पक्षाची माघार, दिल्लीत मोठ्या घडामोडी

SCROLL FOR NEXT