Pachora News Saam tv
महाराष्ट्र

Pachora News : आत्यासोबत नदीवर गेलेली मुलगी नदीत पडून बेपत्ता; धक्क्याने आजोबांचा मृत्यू

Jalgaon News : नदीवर कपडे धुवत असताना नदीत पडलेल्या मुलीला वाचविण्यासाठी गेलेली तिची आत्या देखील नदीच्या प्रवाहात वाहू लागली. सुदैवाने आत्याला बाहेर काढत वाचविण्यात यश मिळाले मात्र मुलगी बेपत्ता झाली होती

Rajesh Sonwane

पाचोरा (जळगाव) : नदीत पाय घसरल्याने एक मुलगी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. सदर घटनेची माहिती गावामध्ये पसरली असताना नातीच्या मृत्यूची बातमी कळताच आजोबाना धक्का बसला. यात त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पाचोरा तालुक्यातील वडगावटेक परिसरात घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

पाचोरा तालुक्यातील वडगावटेक येथील निकिता संतोष भालेराव (वय १४) असे बेपत्ता मुलीचे नाव आहे. तर शामराव विठ्ठल खरे (वय ७२) असे मृत झालेल्या आजोबांचे नाव आहे. दरम्यान पाचोरा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वडगावटेक परिसरात असलेल्या हिवरा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला. यातच निकिता हि तिची आत्या सरला विलास पाटील (वय ३७) हिच्यासह कपडे धुण्यासाठी नदीवर गेली होती. 

आत्या व निकिता हे कपडे धुवत असताना नदीपात्रात पाय घसरल्याने दोघेही वाहू लागले. घटना आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या लक्षात आली असता सरला हिस वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले. मात्र निकिता पुरात वाहून गेली आहे. यानंतर गावात घटना समजल्यानंतर निकिताला शोधण्याचे काम युद्ध पातळीवर ग्रामस्थ करीत आहेत. तर दुपारनंतर पाचोरा नगरपालिका, अग्निशमन यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण टीम घटनास्थळी दाखल झाली.

आजोबांना बसला धक्का 

दरम्यान, निकिता आणि मुलगी सरला पाटील या वाहून गेल्याचे समजताच तिचे आजोबा शामराव विठ्ठल खरे (वय ७२) यांना मानसिक धक्का बसला. त्यातच त्यांचेही वडगाव टेक गावात राहत्या घरी हृदयविकाराने निधन झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Symptoms: लिव्हर खराब होण्यापूर्वी शरीर देतं 'असे' संकेत, जाणून घ्या कोणती आहेत ती लक्षणं...

Maharashtra Live News Update: नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा पुणे श्रमिक पत्रकार संघाकडून निषेध

Online Scam: तुमच्या बँक बॅलन्सवर हॅकर्सची नजर; 'या' ट्रिक्सनं सुरक्षित ठेवा पैसा

तुम्ही 10 कोटींचा कुत्रा पाहिलाय का? व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल|VIDEO

मध्यरात्री ठो-ठो, गोळीबाराचा आवाज ऐकून नागरीक घाबरले, बिल्डरच्या ऑफिसवर ३० गोळ्या झाडल्या अन्...

SCROLL FOR NEXT