Lightning Strike Saam tv
महाराष्ट्र

Lightning Strike : वीज पडून मुलाचा मृत्यू; पाचोरा तालुक्यातील घटना

Jalgaon News : वादळीवाऱ्यासह पावसाने रात्री अधिक जोर पकडला. वीजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.

Rajesh Sonwane

पाचोरा (जळगाव) : विजांच्या कडकडाटासह परतीचा पाऊस होत आहे. जळगाव जिल्ह्यात देखील दोन दिवसांपासून पाऊस होत असून पाचोरा तालुक्यात झालेल्या वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसात लोहारी गावाजवळ शेतात वीज पडून एका बालकासह व शेळीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. 

पाचोरा (Pachora) तालुक्यातील लोहारी गावाजवळ असलेल्या अनिल पाटील यांच्या शेतामध्ये शिवराम सिताराम शिंगाडे, पत्नी मंगला शिवराम शिंगाडे व त्यांचा मुलगा गोरखनाथ (रा. पिंप्राळा ता. नांदगाव जि. नाशिक) हे धनगर समाजाचे कुटुंब मेंढरं घेऊन मुक्कामाला होते. दरम्यान १८ ऑक्टोम्बरला सायंकाळपासून सुरु असलेल्या वादळीवाऱ्यासह पावसाने रात्री अधिक जोर पकडला. वीजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. जिरदार पाऊस होत असल्याने मेंढ्यांच्या वाड्याजवळ बनवलेल्या कुपीमध्ये पती- पत्नी व मुलगा बचावासाठी बसले होते.

दरम्यान रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास जोरदार आवाज होऊन (Lightning Strike) वीज थेट गोरखनाथ शिंगाडे यांच्या अंगावर पडली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तसेच त्याचा जवळच असलेल्या एका शेळीचा देखील मृत्यू झाला. विजेचा जोरदार आवाजाने घाबरलेले त्याचे आई- वडिलांनी त्याच्याकडे धाव घेतली. मुलाचा मृतदेह पाहून हंबरडा फोडला. लोहारी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. सकाळी मृत गोरखनाथ याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT