Jalgaon Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: काकाकडून पुतण्याचा खून; भाऊबंदकीत किरकोळ वाद

काकाकडून पुतण्याचा खून; भाऊबंदकीत किरकोळ वाद

साम टिव्ही ब्युरो

पाचोरा (जळगाव) : वाडीशेवाळे (ता. पाचोरा) येथील पाटील कुटुंबीयांच्या भाऊबंदकीत किरकोळ कारणावरून खुनाची (Crime News) घटना घडल्याने सारे गाव सुन्न झाले आहे. पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी (Police) याप्रकरणी प्रथम मारहाणीचा व नंतर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. (Tajya Batmya)

वाडीशेवाळे येथे प्रल्हाद भोसले व त्यांचा पुतण्या पूनमचंद भोसले यांची बांधाला बांध लागून जमीन आहे. पूनमचंद भोसले यांचा मुलगा किरण याची बैलजोडी (Jalgaon) रविवारी (ता. २७) दुपारी चारच्या सुमारास प्रल्हाद भोसले यांच्या शेतात शिरली. त्याचा राग येऊन प्रल्हाद भोसलेंनी नात्याने नातू लागत असलेल्या किरण भोसलेच्या पाठीत काठीने वार केला. तर प्रल्हाद भोसले यांचा मुलगा गणेश भोसले याने पूनमचंद भोसले यांच्या डोक्यात काठीने जोरदार वार केल्याने त्यांना जबर दुखापत झाली. त्यांना तत्काळ जळगाव येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. या प्रकरणी किरण भोसले याने (Pachora) आपले चुलत आजोबा प्रल्हाद भोसले व गणेश भोसले यांच्याविरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलिसांकडे तक्रार दिली. सहाय्यक फौजदार रवींद्र पाटील, किरण ब्राह्मणे, अरुण राजपूत यांनी गणेश भोसले यास ताब्यात घेतले व त्यास अटक करून न्यायालयापुढे उभे केले असता त्यास ३० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.

जळगाव येथे उपचारार्थ दाखल असलेले पनमचंद भोसले यांचा बुधवारी (ता. ३०) उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे सारे गाव सुन्न झाले आहे. पोलिसांनी गणेश भोसले व प्रल्हाद भोसले यांच्याविरोधात दाखल केलेला मारहाणीचा गुन्हा खुनाच्या गुन्ह्यात वर्ग केला आहे. या घटनेनंतर वाडीशेवाळे गावात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सोलापुरात सापडला भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह

Saturday Remedies: शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी शनिवारी करा 'हे' ३ सोपे उपाय; घरातील कटकटी होतील कायमच्या दूर!

Rajdhani Express Accident : राजधानी एक्सप्रेसची हत्तींच्या कळपाला धडक, इंजिन अन् ५ डब्बे रूळावरून घसरले

Mumbai Crime: मुंबई हादरली! कोल्डड्रिंकमधून गुंगीचं औषध दिलं, अल्पवयीन मुलींवर बलात्कार; अश्लिल व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल

Kitchen Hacks : सोफा कुशनवर डाग लागल्यास काय करावे? जाणून घ्या योग्य टिप्स

SCROLL FOR NEXT