Pachora Crime Saam tv
महाराष्ट्र

Pachora Crime : बँकेतून काढलेली रक्कम गाडीच्या डिक्की ठेवली; गाडी घराबाहेर लावताच चोरट्यांनी साधला डाव, चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Jalgaon News : बँकेत रक्कम काढण्यासाठी गेलेल्या इसमावर चोरटा नजर ठेवून होता, शेवटपर्यंत त्याने नजर ठेवत दुचाकी घराच्या बाहेर लावल्यानंतर संधी मिळताच दोन लाख रुपयांची रक्कम घेऊन चोरटे पसार झाले

संजय महाजन

जळगाव : बँकेतून रक्कम काढल्यानंतर निघाल्यानंतर चोरटे नजर ठेवून होते. मोपेड गाडीच्या डिक्कीत रक्कम ठेवली असताना देखील गाडी घराच्या बाहेर उभी केल्यानंतर या चोरटयांनी संधी साधत तब्बल २ लाख रुपयांची रक्कम लांबविल्याची घटना पाचोरा शहरातील राणी नगर येथे घडली. चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून या चोरट्यांमध्ये एक अल्पवयीन मुलासह दोन जणांचा सहभाग आहे.  या प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यानुसार शहरातील न्यु उर्दू हायस्कूल ज्युनिअर काॅलेज पाचोरा शाळेत काॅम्प्युटर घेण्यासाठी १ लाख ५० हजार रुपये व बांधकाम मिस्तरीला ५० हजार रुपये देण्याचे असल्याने शाळेचे मुख्याध्यापक यांनी जेडीसीसी बॅंकेच्या खात्यातून २ लाख रुपये काढले. दरम्यान काढलेली रक्कम मुख्याध्यापक यांनी शाळेचे शिक्षक शेख खलिल शेख (रा. नुराणी नगर) यांचे ताब्यात ठेवण्यासाठी दिली. 

शिक्षक शेख खलिल शेख नुरा यांनी सदरची रक्कम त्यांच्या मोपेड गाडीच्या डिक्कीत ठेवुन घराकडे निघाले. घरी पोहचल्यानंतर त्यांनी गाडी घराच्या कम्पाऊंडमध्ये पार्क केली. यानंतर समोर रस्त्यावर एका लहान मुलाने फिट आल्याचा बनाव केला. सदरचा प्रकार शेख खलिल शेख नुरा यांचे लक्षात येताच त्यांनी लहान मुलाकडे धाव घेतली. यातच गाडीला चावी तशीच राहिली. हीच संधी चोरट्यानी साधली. विशेष म्हणजे एक चोरटा हा बॅंकेपासुनच पाळत ठेवून होता. 

पाणी आणायला घरात जाताच साधला डाव 

दोन इसम मोटरसायकलवरुन आले. त्यांनी शेख खलिल शेख नुरा यांना घरातुन पाणी आणण्यास सांगितले. त्यानुसार शेख घरात पाणी घेण्यासाठी गेले असता याचा फायदा उचलत डिक्कीतील दोन लाखांची रोकड काढून चोरटयांनी घटनास्थळावरुन लहान मुलासह पोबारा केला. सदरचा प्रकार शेख खलिल शेख नुरा यांनी तात्काळ पोलिस स्टेशन गाठत अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविला. चोरटे हे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parle G In America: अमेरिकेत किती रुपयांना मिळतो Parle-G, किंमत ऐकून बसेल धक्का

Maharashtra Live News Update: बारामतीत बसपाचे अंत्यविधीचे साहित्य देत अनोखे आंदोलन

Ropeway: सार्वजनिक वाहतुकीसाठी आता रोपवे; कुठे आणि कधीपासून होणार सुरू? तिकीट किती असणार?

Crime : बांबूची काठी डोक्यात घातली, जीवघेणा हल्ला केला; मोठ्या भावाकडून लहान भावाची निर्घृण हत्या

गर्लफ्रेंड मॉलच्या वॉशरूमला गेली, नंतर बॉयफ्रेंडही गेला, अश्लील चाळे करताना दोघांना रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT