Jalgaon Crime News
Jalgaon Crime News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: विवाहितेवर अत्याचार; फोटो व्‍हायरल करण्याची धमकी

साम टिव्ही ब्युरो

पाचोरा (जळगाव) : शेती व घरकाम करणाऱ्या विवाहितेशी ओळख वाढवत तिच्याशी इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. इतकेच नाही तर तिचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो काढून ते (Jalgaon) मित्राला पाठविले अन्‌ व्हायरल करण्याची धमकी देत मित्रानेही अत्याचार केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध पाचोरा पोलिसात (Police) गुन्हा दाखल झाला आहे. दोघांना अटक करण्यात आली आहे. (Jalgaon Pachora News)

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार ती शेती व मिळेल ते घरकाम करून उदरनिर्वाह चालवते. तिचा पती इलेक्ट्रिक व शेतीची कामे करतो. दोन्ही मुले शिक्षणासाठी बाहेरगावी आहेत. विवाहितेच्या पतीने शहरातीलच दीपक कंखरे यांच्याकडे इलेक्ट्रिकचे काम केल्याने त्याची ओळख झाली होती, त्यातून मैत्री वाढली. दीपक हा (Crime News) पीडित विवाहितेच्या घरी दूधही देत असल्याने त्याच्याशी ओळखी झाली. काही वेळा मोबाईलवर संभाषणही झाले.

फोन उचलत नाही म्‍हणून धमकावले

ऑगस्ट २०२१ मध्ये पती घरी नसताना दीपक कंखरे याने पीडिताला फोन केला. परंतु ती फोन उचलत नसल्याने दीपकने अज्ञाताला पीडिताकडे पाठवले व दीपकचे फोन उचलले नाही तर 'तुझ्या अंगावर अँसिड टाकू, दीपकचे फोन उचल’ असे धमकावल्याने पीडिताने दीपकचा फोन उचलला. त्याने व्हिडिओ कॉल केला व त्या संभाषणाचे रेकॉर्डिंग केले. घरी येऊन धमकावत इच्छेविरुद्ध दोन-तीन वेळा अत्याचार केले. अर्धनग्न अवस्थेतील फोटो काढले. मोबाईल स्क्रीन शॉट वरून घेतलेले पीडिताचे फोटो दीपकने मित्र सागर परदेशीला पाठवले.

मुलाला ठार मारण्याची धमकी

सागरने देखील पिडितेस घरगुती कामासाठी घरी बोलावत दीपकने पाठवलेले फोटो दाखवत ते व्हायरल करण्याची धमकी देत पीडिताच्या इच्छेविरुद्ध एकवेळा अत्याचार केला. हा प्रकार कुणाला सांगितला तर बाहेरगावी असलेल्या मुलाला ठार मारण्याची धमकीही पिडीतेला देण्यात आली. पीडिताच्या आईला याबाबत माहिती देऊन काही फोटो दाखवण्यात आले. तेव्हा पीडित विवाहितेच्या पतीने सागर परदेशीला घरी बोलावत फोटोबाबत विचारले असता त्याने हा प्रकार गांभीर्याने घेतला नाही. पीडिताने या प्रकाराला व धमक्यांना कंटाळून पाचोरा पोलिसात तक्रार दिली. त्याआधारे पोलिसांनी दीपक कंखरे, सागर परदेशी व पीडित विवाहितेकडे अॅसिडचा कॅन घेऊन जाऊन धमकी देणारा अनोळखी अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दीपक व सागर या दोघांना अटक केली आहे. पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे तपास करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Petrol Diesel Price: मुंबईसह पुण्यातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; वाचा आजच्या किंमती

Sleeping Time: दिवसाला किती तास झोप घ्यावी?

Beetroot Dosa Recipe : सकाळच्या नाश्त्याला झटपट बनवा बीट डोसा; रंग पाहून लहान मुलं देखील ताव मारतील

Lok Sabha Election |अबब! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात 9 हजार कोटींचा मुद्देमाल जप्त!

SCROLL FOR NEXT