Online Fraud Saam tv
महाराष्ट्र

Online Fraud : पिझ्झा फ्रेंचायसी देण्याचे कारण सांगत साडेअकरा लाखांत फसवणूक

Jalgaon News : फ्रेन्चायजीच्या नावाखाली त्याने ऑनलाइन अर्ज भरून घेत त्यासाठीचे आवश्यक कागदपत्रे मागितली. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगत संबंधिताने विश्वास संपादन केला

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : सायबर गुन्हेगार फसवणूक करण्यासाठी नवनवीन आयडिया अवलंबत आहेत. यात आणखी एक प्रकार जळगावात समोर आला असून पिझ्झा विक्रीसाठी बड्या कंपनीची फ्रेंचाइजी देण्याचे सांगितले. तरुणाचा विश्वास संपादन करून पाचोरा येथील तरुणाकडून ११ लाख ५० रुपये घेत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

पाचोरा (Pachora) येथील जतीन किशोर केसवाणी या तरुणाला पाचोऱ्यात पिझ्झा विक्री सेंटर उघडायचे होते. त्यासाठी एका कंपनीची फ्रेंचाइजी घेण्याच्या शोधात होता. या दरम्यान हरीश जैन या व्यक्तीचा २६ एप्रिलला फोन आला. त्यानंतर त्या फ्रेन्चायजीच्या नावाखाली त्याने ऑनलाइन अर्ज भरून घेत त्यासाठीचे आवश्यक कागदपत्रे मागितली. (Online Fraud) सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगत संबंधिताने विश्वास संपादन केला. 

सर्व माहिती दिल्यानंतर जैन या व्यक्तीने त्याचा बँक (Bank) खात्याचा क्रमांक देऊन, त्या खात्यावर फ्रेंचाइजीसाठीची रक्कम भरण्यास सांगितले. त्यानुसार युवकाने टप्प्याटप्प्याने एकूण ११ लाख ५० हजार रुपये संबधिताच्या खात्यावर वर्ग केली. मात्र, त्यानंतर संबंधित व्यक्तीने तीन दिवसांपासून फोन बंद करून ठेवला. त्या युवकाने संपर्क साधला असता संपर्क होत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसांकडे हरीश जैन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : नोटीस कोणत्या अधिकाराने थांबवली? उच्च न्यायालयाचा एकनाथ शिंदेंना सवाल |VIDEO

Maharashtra Live News Update: थोड्याच वेळात राहुल गांधींची पत्रकार परिषद, काय बोलणार?

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र आल्याने मविआवर परिणाम होणार का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Aishwarya Rai-Salman Khan Breakup : "तो भिंतीवर डोके आपटायचा..." लोकप्रिय दिग्दर्शकाचं ऐश्वर्या-सलमानच्या नात्यावर विधान

चकमकीत आरोपीकडून पोलिसांवर हल्ला, गोळीबारात ३ पोलिसांचा मृत्यू, हल्लेखोराला संपवलं

SCROLL FOR NEXT