Jalgaon ZP Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: जिल्‍हा परिषद निवडणुकीपुर्वी कुणाचा पत्‍ता पडणार; आज आरक्षण सोडत

जिल्‍हा परिषद निवडणुकीपुर्वी कुणाचा पत्‍ता पडणार; आज आरक्षण सोडत

साम टिव्ही ब्युरो

जळगाव :‎ जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांसाठी १३ जुलैला आरक्षण काढण्यात येणार होते. ही निवडणूक ओबीसी आरक्षणाविना (OBC Reservation) होणार होती. दरम्यान, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर १३ जुलैला काढण्यात येणारे आरक्षण रद्द करण्यात आले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गुरुवारी (ता. २८) दुपारी‎ तीनला (Zilha Parishad) जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांचे आरक्षण काढण्यात येणार आहे. गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत नियोजन भवनात गटांचे आरक्षण निघेल, तर सकाळी अकराला संबंधित पंचायत समितीच्या ठिकाणी तहसीलदार किंवा गटविकास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आरक्षण निघेल. (Jalgaon Zilha Parishad News)

जिल्हा परिषदेचे (Jalgaon ZP) ७७ गट व पंचायत समितीच्या १५४ गणांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येईल. आपला गट, गण कोणत्या आरक्षणात‎ मोडतो, याकडे आता इच्छुकांचे लक्ष‎ लागून आहे. आरक्षण सोडत जाहीर‎ झाल्यावर इच्छुकांची पुढील दिशा ठरणार आहे. ओबीसी आरक्षणासह ही सोडत निघेल. या निवडणुकीत दहा‎ गट वाढल्याने प्रत्येक जातीनुसार किमान‎ दोन ते तीन संख्येची भर पडणार आहे.‎ जिल्ह्यातील लोकसंख्या, गटातील‎ ओबीसींच्या संख्येनुसार ओबीसीच्या‎ १७ जागांवर आरक्षण निघण्याची शक्यता‎ आहे.‎

२०१७ मध्ये असे होते आरक्षण‎

एकूण जागा : ६७

सर्वसाधारण जागा एकूण‎ : ३२

त्यात स्त्री राखीव जागा : १६

स्त्री सर्वसाधारण जागा : १६

नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण जागा : १८ (स्त्री राखीव ९, पुरुष ९)

अनुसूचित‎ जमाती एकूण जागा : ११ (स्त्री राखीव ६,‎ पुरुष ५)

अनुसूचित जाती एकूण जागा : ६‎ (स्त्री राखीव ४, पुरुष २)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : पार्टनरसाठी पैसा खर्च करावा लागणार; प्रेमात वाद होणार; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Saturn Jupiter yog: 48 तासांनंतर पलटणार 'या' राशींचं नशीब; शनी-गुरु तयार करणार शतांक योग, मिळणार फक्त पैसा

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

SCROLL FOR NEXT