jalgoan zp 
महाराष्ट्र

गुड न्यूज.. अनुकंप पदभरतीचा पुन्‍हा जॅकपॉट!

गुड न्यूज... अनुकंपा पदभरतीचा पुन्‍हा जॅकपॉट!

Rajesh Sonwane

जळगाव : जिल्‍हा परिषदेच्‍या अनुकंपा भरतीचा रखडलेला प्रश्‍न मार्गी लागत आहे. आठवडाभरापूर्वी समुपदेशनाद्वारे झालेल्‍या अनुकंपा भरतीनंतर पुन्‍हा भरतीचा जॅकपॉट लागला आहे. ३१ डिसेंबरपर्यंत शंभर जणांची भरती केली जाणार आहे. यासाठी कागदपत्र तपासणीला सुरवातदेखील झाली आहे. (jalgaon-news-zilha-parishad-Compassionate-Recruitment-Again-hundred-vacant)

जिल्‍हा परिषदेंतर्गत (Jalgaon Zilha Parishad) असलेल्‍या विभागांमध्‍ये कार्यरत असताना मयत झालेल्‍या कर्मचारींच्‍या वारसांना अनुकंपेवर भरती केले जात असते. परंतु, मागील आठ-दहा वर्षांपासून अनुकंपेची भरती प्रक्रिया झाली नसल्‍याने जवळपास साडेतिनशेहून अधिक उमेदवार प्रतीक्षा यादीत होते. मात्र मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया (Ceo Pankaj Aashiya) यांनी हा प्रश्‍न मार्गी लावत गेल्‍या आठवड्यातच ८७ जणांच्‍या समुपदेशनाद्वारे नियुक्‍ती दिली आहे. यानंतर पुन्‍हा शंभर उमेदवारांची भरती (Recruitment) करून प्रतीक्षा यादी कमी करण्याचा प्रयत्‍न सीईओ डॉ. आशिया यांचा आहे.

महिनाअखेरपर्यंत प्रक्रिया

शासन नियमानुसार यंदा २० टक्‍के अनुकंपा धारकांना नोकरी देण्यात आली आहे. यानंतर जिल्‍हा परिषदेतंर्गत रिक्‍त पदांच्‍या २५ टक्‍के अनुकंपा भरती करावयाची आहे. त्‍यानुसार शंभर रिक्‍त जागा या अनुकंपेद्वारे भरल्‍या जातील. याची तयारी सध्‍या जिल्‍हा परिषदेत सुरू असून, ३१ डिसेंबरपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्‍न राहणार असल्‍याने सामान्‍य प्रशासन विभागाच्‍या उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी स्‍नेहा कुडचे- पवार यांनी सांगितले.

कागदपत्र तपासणी

अनुकंपाच्‍या प्रतीक्षा यादीत असलेल्‍या साडेतीनशे उमेदवारांपैकी शंभर जणांची शासकीय नोकरीची प्रतीक्षा संपणार आहे. यासाठी प्रतीक्षा यादीत असलेल्‍या उमेदवारांच्‍या कागदपत्र तपासणीला आजपासून (ता. २१) सुरवात झाली आहे. ही पडताळणी लवकर पूर्ण करून पुढील प्रक्रिया देखील राबविली जाणार आहे.

विस्तार अधिकारिपदी पदोन्नती

जळगाव : जिल्हा परिषद प्रशासनाने केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांमधून १९ जणांची शिक्षण विस्तार अधिकारिपदी पदोन्नती करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी मंगळवारी पदोन्नतीचे आदेश काढले. गेल्या काही महिन्यांपासून शिक्षण विभागातील पदोन्नती रखडलेली होती. त्यामुळे पदोन्नतीची प्रक्रिया तात्काळ राबविण्याची मागणी होत होती़. अखेर मंगळवारी (ता.२१) रिक्‍त जागांवर विस्तार अधिकारिपदी पदोन्नतीद्वारे नियुक्‍ती करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: बारामतीमध्ये जय पवार बाईक रॅलीमध्ये सहभागी

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

SCROLL FOR NEXT