Jalgaon News Electric Shock Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: काम करताना मानेलाच चिकटली वायर; विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

तोंडातून फेस आला व तो बेशुद्ध पडला, असा बनाव करण्यात आला

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शहरातील कालिंकामाता मंदिर परिसरातील योगेश्वरनगरात २२ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने (Electric Shock) मृत्यू झाला. समीर शेख राजमोहमंद (वय २२, रा. इंदिरानगर शाहूनगर) असे (Jalgaon) मृताचे नाव आहे. (Breaking Marathi News)

जळगावातील योगेश्‍वरनगरात बुधवारी (२१ जून) जिन्याखाली कोबा करीत असताना जिन्याखाली बसविलेल्या कूपनलिकेची वायर समीरच्या मानेला चिकटली. यात विजेच्या धक्क्याने शेख समीर याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर नागरिक व बांधकाम कामगारांनी वीजपुरवठा बंद केला व समीरला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Jalgaon Medical Collage) दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले.

मृत्‍यूचा केला बनाव

समीरच्या तोंडातून फेस आला व तो बेशुद्ध पडला, असा बनाव करण्यात आला. मात्र, वायर चिकटल्याने मृताच्या मानेवर काळा चट्टा पडला होता. विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल डॉक्टरांनी पोलिसांना दिला आहे. शेख समीर याच्या मागे लहान भाऊ आणि विधवा आई आहे. कुटुंबाच्या उदनिर्वाहाची जबाबदारी त्याच्यावर होती. त्याच्या मृत्यूला जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंब व नातेवाईकांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांकडून पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू,अंदाज चुकला अन् विपरित घडलं!

पालघर पाण्यात, मृतदेह छतावर, मृत्यूनंतरही नरकयातना थांबेनात

Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेत २३ लोकांपैकी १४ जणांची सुटका तर ८ लोकांचा मृत्यू

सिद्धिविनायकची दानपेटी कुणी लुटली? शिंदेंचा बांदेकरांवर आरोप, ठाकरेंवर निशाणा

SCROLL FOR NEXT