Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: पोहण्याचा मोह जीवावर बेतला; जलतरण तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

पोहण्याचा मोह जिवावर बेतला; जलतरण तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : सुट्टीचा दिवस असल्याने मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या सलमान शकील बागवान (वय २४, रा. जोशीपेठ, बागवान वाडा) या तरुणाचा (Jalgaon) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुलातील जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (१८ जून) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस (Police) ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. (Latest Marathi News)

जळगाव शहरातील जोशी पेठेतील बागवान वाड्यातील रहिवासी सलमान बागवान फळ विक्री करीत होता. रविवारी फळ विक्री बंद असल्याने तो दुपारी चारच्या सुमारास मित्रांसोबत जलतरण तलावात पोहायला गेला. त्या ठिकाणी पोहत असताना त्याला जलतरण तलावातील खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

मित्रांनी बोलाविले सुरक्षारक्षकाला

सलमान बुडत असल्याचे काही मित्रांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ जलतरण तलावातील सुरक्षारक्षकांना बोलावून, सलमानला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी सलमानला मृत घोषित केले. जिल्हा रुग्णालयात (Jalgaon Civil Hospital) सलमानच्या नातेवाईक व मित्रांनी मोठी गर्दी केली होती. मृत सलमानच्या मागे आई, वडील, मोठा भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे.

मृत्यूचे कारण अस्पष्ट

मृत सलमान बागवान याच्या मृत्यूबाबत त्याचे कुटुंब व नातेवाइकांनी तरण तलाव नियंत्रकांवर आरोप केला असून, रात्री जिल्हापेठ पोलिसांत गर्दी केली होती. पोलिसांनी घडल्या प्रकाराबाबत चौकशीचे आश्वासन दिले असून, तरणतलावचे सीसीटीव्ही फुटेज संकलीत केल्यावर नेमका काय प्रकार घडला, हे स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा बस डेपोत उभ्या असलेल्या बसने घेतला पेट

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या नावे रमाई आवास योजनेत घोटाळा; फडणवीसांच्या नावाचं बनवलं चक्क आधार आणि रेशनकार्ड

रत्नागिरीला भूकंपाचा हादरा; घाबरून लोक घराबाहेर पळाले

LPG Crisis : 'गॅस' भडका शमवण्यासाठी ओतणार 'रॉकेल'; टंचाईवर काढला तोडगा, सरकारनं घेतले २ महत्वाचे निर्णय

मुंबईत 12 मार्च 1993 ची पुनरावृत्तीचा डाव? मुंबईत साखळी बॉम्बस्फोटांची धमकी?

SCROLL FOR NEXT