Chalisgaon News Saam tv
महाराष्ट्र

Chalisgaon News: गावी आलेल्‍या तरुणाने संपविले जीवन

गावी आलेल्‍या तरुणाने संपविले जीवन

साम टिव्ही ब्युरो

तरवाडे (जळगाव) : तरवाडे (ता. चाळीसगाव) येथील ३५ वर्षीय तरुणाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची (Chalisgaon) घटना आज सकाळी आठच्या सुमारास उघड झाली. आत्‍महत्‍या केल्‍याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. (Live Marathi News)

तरवाडे (ता. चाळीसगाव) येथील रहिवासी मनोज राजेंद्र पाटील (वय 35) हा त्याच्या घरच्या शेतातील बोरीच्या झाडाच्या फांदीला दोरीच्या सहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या संदर्भात शेजारील शेतकरी संभाजी पाटील सकाळी त्याच्या शेतात मका पिकाला पाणी भरण्यासाठी गेले असता दुरुनच बांधावर एक पुरुष उभा असल्याचा दिसून आले. बराच वेळ एकाच जागी उभा असल्याने त्याला भीती वाटू लागली. त्याने त्याचे काका दादा पाटील यांना फोन करून बोलावले. त्यानंतर दादा पाटील शेतात येऊन पाहिले असता मनोज पाटील गळफास घेतल्‍याच्‍या अवस्‍थेत दिसून आला.

मृत्‍यूचे कारण अस्‍पष्‍ट

यानंतर त्यांनी गावात पोलीस पाटील व नातेवाईकांना फोन करून सांगितले. त्याचे मोठे भाऊ उमेश पाटील यांनी मृतदेह पाहिला असता एकच टाहो फोडला. त्यांनी ग्रामीण पोलिसात खबर दिल्यावरून पोलीस (Police) घटनास्थळी दाखल होऊन लटकलेल्या मृतदेह खाली उतरवून शिवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही. मनोज हा पुणे येथे खाजगी गृहरक्षक म्हणून काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण करत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: आई-वडील कामावर गेले, खेळता खेळता मुलं खड्ड्यात पडली; सख्ख्या बहीण-भावाचा बुडून मृत्यू

अभिषेक शर्मानं रचला इतिहास, ICC रँकिंगमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड; कुणालाही जमलं नाही ते करून दाखवलं!

Chanakya Neeti : वैवाहिक जीवनात कटकट, चीडचीड नको; तर 'या' चार गोष्टी लक्षात ठेवा

Maharashtra Live News Update: भांडुपमधील एका सार्वजनिक शौचालयात सापडलं स्त्री जातीचं अर्भक

Election Commission: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत

SCROLL FOR NEXT