Jalgaon News
Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

मध्‍यरात्री छतावरून पडल्‍याने तरूणाचा मृत्‍यू

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शहरातील गोलाणी मार्केटच्या छतावरून मध्यरात्रीच्‍या सुमारास पडल्याने तरूणाचा जागीच मृत्‍यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलीसात (Police) अकस्तात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (jalgaon news young man dies after falling from a roof in the middle of the night)

मुकेश रमेश राजपूत (वय-३२) रा. नाथवाडा असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. मुकेश राजपूत जळगावात (Jalgoan) कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मुकेश हा महापालिकेच्‍या सतरा मजली इमारतीजवळ असलेल्‍या खाऊगल्लीत चायनिज दुकानावर कामाला होता. सोमवारी (९ मे) सायंकाळी कामावर आला होता. रात्री काम आटोपून घरी निघून गेला. दरम्यान रात्री १२.३० वाजता तो गोलाणी मार्केटच्या छतावरून खाली पडल्याचे त्याचा जागीच मृत्यू (Death) झाला.

कामावरून घरी गेलेला मुकेश गोलाणी मार्केटमध्ये रात्री उशीरा काय करत होता याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Jalgaon Medical Collage) दाखल करण्यात आला. यानंतर आज (१० मे) सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : काँग्रेसने अदानी-अंबानीकडून किती पैसा घेतला? PM मोदींची टीका

Dance Viral Video: कॉलेज फेस्टमध्ये डान्स करता करता मुलीनं शर्ट काढून फेकला; VIDEO व्हायरल, नेटकरी भडकले

Bhandara News: धावत्या बसमध्ये प्रवाशानं सोडला जीव; भोवळ आल्यावरच बस हॉस्पिटलला नेण्याची केली विनंती, पण कंडक्टर अडून बसला

Maharashtra Politics : काँग्रेस मजबूत, तर देश मजबूत होईल; शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

Nashik Crime News : गुन्हेगार मित्रांची संगत नडली, नाशिकमध्ये ६ जणांसह ८७ गुंड तडीपार

SCROLL FOR NEXT