bribe
bribe 
महाराष्ट्र

यावलचे मुख्‍याधिकारी तडवी अडकले; २८ हजाराची लाच घेतांना पकडले रंगेहाथ

Rajesh Sonwane

जळगाव : यावल नगरपालिकेचे मुख्याधिकारी बबन तडवी यांना कंत्राटदाराकडून लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले. साठवण बंधार्‍याच्या कामांसाठी कंत्राटदाराकडून लाच मागितल्‍याचे हे प्रकरण आहे. (jalgaon-news-Yaval-nagar-palika-chief-Tadavi-arrested-got-red-handed-taking-a-bribe)

यावल नगरपालिकेचे मुख्याधिकारी बबन तडवी यांनी कंत्राटदाराकडून पैशांची मागणी करत साठवण बंधार्‍याचे काम मिळवून देतो असे सांगून लाच मागितली होती. याबाबत संबंधीत कंत्राटदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची शहानिशा करत पथक तयार करण्यात आले.

२८ हजार घेतांना पकडले

सदर पथकाने यावल नगरपालिकेत सापळा रचला. दुपारी एकच्या सुमारास मुख्याधिकारी बबन तडवी हे कंत्राटदाराकडून २८ हजार रूपयांची रक्‍कम घेत असताना रंगेहाथ पकडले गेले. तडवी यांना अटक केल्‍यांतर पथक जळगावकडे रवाना झाले. अवघ्या काही मिनिटांमध्ये झालेल्या या कारवाईमुळे नगरपालिका परिसरात खळबळ उडाली आहे.

मुख्‍याधिकारींबाबत अनेक तक्रारी

यावलचे मुख्याधिकारी बबन तडवी यांच्याविरूद्ध अनेक तक्रारी होत्‍या. त्‍यांवर आरोप देखील करण्यात आले होते. यातच काही प्रकरणांमध्ये त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील नगरपालिका सदस्‍यांकडून करण्यात आली होती. अशातच आज लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून झालेल्‍या कारवाईने खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News: महायुतीच्या प्रमुख नेत्यांची उद्या मुंबईत बैठक

Maharashtra Lok Sabha: राज्यात तिसऱ्या टप्प्यात 54,09 टक्के मतदान, कोल्हापुरात सर्वाधिक, तर बारामतीत सर्वात कमी मतदान

Lok Sabha Election : ४० वर्षांच्या महिलेच्या ओळखपत्रावर मतदान करण्यासाठी आली 8 वीतील मुलगी, बोगस मतदानाचा Video आला समोर

Pune PDCC Bank: मोठी बातमी! PDCC बँकेवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Haryana Politics: हरियाणात भाजपला मोठा धक्का, 3 अपक्ष आमदारांनी सोडली साथ; सरकार अल्पमतात येणार?

SCROLL FOR NEXT