रावेर (जळगाव) : महिला दिनाच्या पूर्वसंध्येला येथील डॉ. योगिता पाटील यांनी रावेर येथून बऱ्हाणपुर येथे रात्री जात असतांना खानापूरजवळ मोठ्या वाहनाने कट मारून जखमी व बेशुद्ध झालेल्या इसमावर वेळीच उपचार केले. यामुळे इसमास दिलासा मिळाला. महिला दिनाच्या (Womens Day) पूर्वसंध्येला त्यांच्या या कार्याचे व धाडसाचे कौतुक होत आहे. (jalgaon news womens day Treatment for man who fell unconscious on the road at night)
रावेर (Raver) येथील माऊली हॉस्पीटलचे डॉ. संदिप पाटिल व त्यांच्या पत्नी डॉ. योगिता पाटील हे सोमवारी (ता. ७) रात्री आठ वाजेच्या सुमारास रावेर येथून बऱ्हाणपुर (Barhanpur) येथे जात होते. या दरम्यान खानापूर पुलाजवळ एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे निदर्शनास आले. यावेळी डॉ. योगिता पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता गाडी थांबवून गाडीत नेहमी ठेवलेले इमर्जन्सी उपचाराचे बॉक्स काढून अपघात झालेल्या इसमाकडे जात रिससीटैशन करून व सलाईनद्वारे इंजेक्शन देऊन उपचार करून बेशुद्ध अवस्थेततून ठीक करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
उपचारार्थ रुग्ण रावेरला
बेशुद्ध अवस्थेतील गृहस्थ तुळशिराम सुभाष सावळे हे अपघात झालेल्या ठिकाणापासून तीन– चार किलोमीटर अंतरावरील कर्जोत येथील असल्याचे निश्पन्न झाले. डॉ. संदीप पाटील यांनी अँबुलन्स व पोलिसांना (Police) माहिती देऊन पुढील उपचारार्थ रुग्णाला रावेरला पाठवले. एक महिला डॉक्टरने रात्रीच्या वेळेस रस्त्यावरील रुग्णाला रस्त्यावरच उपचार करत असताना बघून परिसरातील लोकांनी सुद्धा मदतीचा हात पुढे केला. उपस्थित प्रवासी नागरीक व सावळे यांच्या परिवाराने माऊली हॉस्पीटलचे डॉ. योगिता पाटील व डॉ. संदीप पाटील यांचे कौतुक करून आभार मानले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.