Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : भादलीत महिलेने घेतला टोकाचा निर्णय; दोन्ही मुले झाली अनाथ

Jalgaon News : जळगाव तालुक्यातील भादली येथील जुलेखा गफ्फार पटेल (वय २८) यांच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. दोन मुलांचे संगोपन करत जुलेखा या सासरीच वास्तव्यास होत्या.

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : वारंवार छळ होत असल्याने भादलीत विधवा महिलेने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना २ फेब्रुवारीला घडली. (Jalgaon) मात्र, ही आत्महत्या नसून तिला सासरच्या मंडळींनी मारल्याचा आरोप माहेरच्यानी केला आहे. मृत महिलेच्या भावाच्या तक्रारीवरुन नशिराबाद पोलिस (Police) ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यात दोन संशयीतांना अटक करण्यात आली. (Maharashtra News)

जळगाव तालुक्यातील भादली येथील जुलेखा गफ्फार पटेल (वय २८)  यांच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. दोन मुलांचे संगोपन करत जुलेखा या सासरीच वास्तव्यास होत्या. दरम्यान २ फेब्रुवारीला सकाळी सातच्या सुमारास त्यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले. सासरच्या मंडळींनी तिच्या माहेरी ही बाब कळविली. मृत महिलेची माहेरची मंडळी शासकीय रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर जुलेखाचा मृतदेह स्वत: रुग्णालयात न आणता तो, रिक्षात पाठवून दिल्याचा माहेरच्या मंडळींनी आरोप केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घातपाताचा आरोप
जुलेखा पटेल यांनी आत्महत्या केली नसून सासरच्या मंडळींनी मारल्याचा आरोप मृत जुलेखा यांच्या भावासह नातेवाईकांनी केला. यावरून सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक होत नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली. मृत महिलेचा भाऊ हसीम याकूब पटेल यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन सासू अशरफ मुसा पटेल, जेठ कालू ऊर्फ गयासोद्दीन पटेल, हारुण पटेल, ईसा पटेल, जेठाणी मदिना पटेल, मीना पटेल यांच्यासह वसीम सलीम पिंजारी (सर्व रा. भादली) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी जेठ कालू पटेल व इसा पटेल यांना अटक करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाडेकरूंची माहिती लपवणं पडलं महागात; पुणे शहरातील ७६ घरमालक आणि ‘पीजी’ चालकांवर गुन्हे दाखल

Maharashtra News Live Update: Dhule: अक्कलपाडा जलवाहिनीला पुन्हा मोठी गळती, लाखो लिटर पाणी वाया

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा अजुनही वाऱ्यावर; लोकल प्रवाशाकडे सापडला 35 सेमीचा चाकू

Nag Panchami 2026: नागपंचमीला तवा - कढई का वापरू नये? ही माहिती वाचून बसेल धक्का

Shravan Green Saree Design: श्रावणात हिरव्या साडीची जादू; ट्राय करा ग्रीन साडीचे हे 7 लेटेस्ट ट्रेंडी डिझाइन्स

SCROLL FOR NEXT