Electric Shock Saam tv
महाराष्ट्र

Electric Shock : मोटार सुरु करताना विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू; माहेरच्यांचा मात्र घातपाताचा आरोप

Jalgaon News : विजेचा झटका बसल्याने मृत्यू झाला. दरम्यान, हा अपघाती मृत्यू नसून घातपात झाल्याचा आरोप करत माहेरच्या मंडळींनी मृतदेह ताब्यात घेत दुसऱ्या दिवशी मृत महिलेवर भादली येथे अंत्यसंस्कार केले.

Rajesh Sonwane

जळगाव : पाणी भरण्यासाठी मोटार सुरु होती. याच वेळी वीजपंपाला स्पर्श होऊन विजेचा जोरदार झटका बसला. यात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना भुसावळ तालुक्यातील वांजोळा येथे घडली आहे. दरम्यान या घटनेनंतर मात्र महिलेच्या माहेरच्या मंडळींनी सासरच्या मंडळींवर आरोप करत घातपात केल्याचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. 

भुसावळ तालुक्यातील वांजोळा येथील दीपाली चेतन तायडे (वय २५) असे घटनेत मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. महिलेच्या पश्चात पती, चार वर्षांचा मुलगा आणि दोन वर्षांची मुलगी असा परिवार आहे. सदरची घटना २५ जुलैला घडली आहे. यात दीपाली तायडे या सकाळी पाणी भरत असताना, वीज पंपाला धक्का लागून खाली कोसळल्या. घरच्या मंडळींच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी लागलीच धाव घेत शेजाऱ्यांच्या मदतीने दीपालीला तत्काळ भुसावळच्या खासगी रुग्णालयात आणले. 

घातपात केल्याचा माहेरच्या मंडळींचा आरोप 

रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. तर याबाबत माहिती मिळताच भादली येथे माहेरच्या मंडळींनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेत आक्रोश केला. तर त्यांनी मुलीचा मृत्यू आकस्मिक नव्हे, तर घातपात झाल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी केला. यावरून ग्रामीण रुग्णालयात माहेर आणि सासरच्या मंडळींमध्ये काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. 

१० हजारात बालकाला विकल्याप्रकरणी आईसह सात जणांवर गुन्हा
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील मुरूम येथील अडीच वर्षाच्या बालकाला दहा हजारात विकल्या प्रकरणी आईसह ७ जणांवर मुरूम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी गुन्हा जळगाव जिल्ह्य़ातील चाळीसगाव येथे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी मागील दोन दिवसापासून गोंधळ सुरू होता. बालक शुभम तळभंडारे याची दहा हजारात विक्री प्रकरणी बेकायदेशीररीत्या दत्तक विधानाचा १०० रुपयांच्या बॉण्डवर करारनामा केला होता. या प्रकरणी शुभमची आजी लता तळभंडारे यांनी पोलीसात तक्रार केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: मित्रांसोबत धमाल कराल, ५ राशींना अचानक होणार लाभ; वाचा रविवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: निकृष्ट काम केल्याने ठेकेदाराला १० लाख रुपयांचा दंड

RCB vs GT Final : पावसामुळं फायनल रद्द झाली तर कोण ठरणार IPL विजेता, जाणून घ्या नियम

Smoothening VS Keratin: केस खूप ड्राय आणि फ्रिझी झालेत? केसांसाठी कोणता ट्रीटमेंट फायदेशीर? जाणून घ्या

गोठ्याला लागलेल्या भीषण आगीत आठ शेळ्या जळून खाक, शेतकऱ्यावर कोसळला दुःखाचा डोंगर

SCROLL FOR NEXT