कामबंद 
महाराष्ट्र

नगरच्‍या डॉक्‍टर, परिचारीकांचे निलंबन मागे घ्या; जळगावात परिचारिकांचे कामबंद

नगरच्‍या डॉक्‍टर, परिचारीकांचे निलंबन मागे घ्या; जळगावात परिचारिकांचे कामबंद

संजय महाजन

जळगाव : अहमदनगर दुर्घटनेत जबाबदार धरत निलंबित करण्यात आलेल्या डॉक्‍टर आणि परिचारिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे. त्याच बरोबर त्यांचे निलंबनही मागे घेण्यात यावे; या मागणीसाठी जळगाव जिल्‍हा शासकीय रुग्णालयातील परिचारिकांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. (jalgaon-news-Withdraw-the-suspension-of-ahamadnagar-doctors-and-nurses-Nurse-strike)

अहमदनगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत काही रूग्‍णांचा बळी गेला. यानंतर काही परिचारिका आणि डॉक्‍टर यांना जबाबदार धरून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र सरकारची ही कारवाई कर्मच्याऱ्यांवर अन्याय करणारी आहे. याचा निषेध करण्यासाठी आणि कारवाई मागे घेण्यात यावी; यासाठी जिल्ह्यातील परिचारिकांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.

रुग्णसेवा कोलमडली

परीचारीकांनी मागण्यासाठी जिल्हा रुग्णालय परिसरात निदर्शने केली. शिवाय परिचारिकांनी सकाळपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे जिल्‍हा शासकिय रुग्णालयातील रुग्णसेवा कोलमडली आहे. त्याचा फटका रुग्णांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रोहित पवारांच्या जीवाला धोका? पवार कुटुंबाला रोहित पवारांची काळजी

Pune News: हा कसला मुळशी पॅटर्न! 'सिकंदर शेख'वर मैदानातच हल्ल्याचा प्रयत्न, मुळशीत कुस्तीला गालबोट; पाहा VIDEO

शिवजयंतीला राज ठाकरेंना वाघनखांची भेट; आता याच वाघनखांनी सगळ्यांशी शेकहँड करतो|VIDEO

Maharashtra Politics: राज ठाकरेंनी ठाण्यात एकनाथ शिंदेंची भेट घेताच उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय; दोन्ही बंधूंमध्ये पुन्हा बिनसलं?

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या विमाना अपघाताचा प्राथमिक अहवाल 28 तारखेपूर्वी येणार

SCROLL FOR NEXT