जळगाव : रावेर तालुक्यातील काही भागात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्याासह पावसाचा तडाखा बसला. यात वादळी वाऱ्यामुळे विद्युत खांब वाकले तसेच विद्युत तारा तुटून पडल्या आहेत. या तुटून पडलेल्या विजेच्या तारांचा धक्का लागल्याने खिरोदा येथे एका बालकाचा (Death) मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. (Jalgaon news wind blew the electric wire Death of a child due to shock)
रावेर (Raver) तालुक्यातील बऱ्याच परिसराला बुधवारी (८ जून) सायंकाळी वादळी वाऱ्याने जोरदार तडाखा दिला. यामुले खिरोदा तसेच परिसरातील गावांना मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी पत्रे उडाली. तसेच तारा देखील खाली पडल्या. यामुळे या भागातील (Farmer) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
खेळताना तारांना स्पर्श
दरम्यान आज सकाळी खिरोदा येथील बाहेरपुरा भागातील रहिवासी असणाऱ्या अफसर अजित तडवी (वय ५) या बालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. वादळात पडलेल्या तारांना त्याचा स्पर्श झाल्याने या चिमुकल्याला प्राण गमवावा लागल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे. दरम्यान. या प्रकरणी सावदा पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. तर, महावितरणने तातडीने खाली पडलेल्या तसेच लोंबकणाऱ्या तारांची दुरूस्ती करावी अशी मागणी होत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.