vaccination 
महाराष्ट्र

पंधरा ते अठरा वयोगटाच्‍या लसीकरण मोहिमेस सुरवात; जळगाव जिल्‍ह्यासाठी ४५ हजार लशी

पंधरा ते अठरा वयोगटाच्‍या लसीकरण मोहिमेस सुरवात; जळगाव जिल्‍ह्यासाठी ४५ हजार लशी

संजय महाजन

जळगाव : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार १५ ते १८ वर्षे वयोगटातील किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम आजपासून (ता. ३) सुरू झाली. लसीचा पहिला डोस घेण्यासाठी मुलांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्‍याचे पाहण्यास मिळाले. (jalgaon news Vaccination campaigns for 15 to 18 year olds begin)

जळगाव (Jalgaon) जिह्यातील मुलांच्‍या लसीकरण (Corona Vaccination) मोहिमेचा शुभारंभ जळगाव महापालिकेच्‍या छत्रपती शाहू महाराज रूग्‍णालयात झाला. पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या उपस्थितीत पंधरा वर्षे वयोगटाच्यावरील मुलामुलींच्या लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, आयुक्त सतीश कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. नागोराव चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी लसीकरणासाठी आलेल्यांचे औक्षण करून स्वागत केले.

४६ हजार लशी

शाळा महाविद्यालयीन १५ ते १८ वर्ष वयोगटातील युवकासाठी उद्यापासून (ता. ३) लसीकरण (Vaccination) मोहीम राबविली जात आहे. जिल्ह्यात अठरा ते पंधरा वर्षे वयोगटातील मुला- मुलींची संख्या दोन लाख २५ हजार ५२८ आहे. उपलब्ध लस मात्रेनुसार शहर महापालिकेसह जिल्ह्यात केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. या वयोगटासाठी जिल्ह्यात ४५ हजार लशींची उपलब्धता आहे.

शहरात महापालिकेतर्फे ४ केंद्रे

महापालिकतर्फे १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी कोविन ॲपवर ऑनलाइनन नोंदणी केली जात आहे. शहरातील छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल, डी. बी. जैन हॉस्पिटल (शिवाजीनगर), कांताई नेत्रालय (निमखेडी रोड), सिंधी कॉलनीतील चेतनदास मेहता हॉस्पिटल या केंद्रावर लसीकरण सुरू राहील. केंद्रांवर पहिला डोस ५० टक्के ऑनलाइनन व ५० टक्के ऑनसाईट देण्यात येणार आहे उपाशीपोटी लस घेऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT