Parola Unseasonal Rain Saam tv
महाराष्ट्र

Parola Unseasonal Rain : अवकाळी पावसाने पिके उद्ध्वस्त; पारोळा तालुक्यातील ४० गावांना फटका

Jalgaon News : राज्यातील जालना, यवतमाळ, बीड, नंदुरबार, धुळे जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यात देखील वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत असून गुरुवारी पारोळा तालुक्यात गारपीट

संजय महाजन

पारोळा (जळगाव) : तीन- चार दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाचे थैमान सुरु आहे. यातच दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात देखील पाऊस होत आहे. दरम्यान गुरुवारी सायंकाळी पारोळा तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रामुख्याने पारोळा तालुक्यातील जवळपास ४० गावांना याचा मोठा फटका बसला असून २ हजार हेक्टरवर पिके उद्ध्वस्त झाली आहेत. 

राज्यात मागील तीन- चार दिवसांपासून अवकाळी पावसासह काही ठिकाणी गारपीट व वादळी तडाखा बसत आहे. यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होत आहे. राज्यातील जालना, बुलढाणा, नांदेड, यवतमाळ, बीड, नंदुरबार, धुळे जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यात देखील वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत असून गुरुवारी पारोळा तालुक्यात गारपीट झाली आहे. 

वाऱ्यामुळे पिके झाली जमीनदोस्त 

दरम्यान पारोळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अक्षरशः शेतातली संपूर्ण पिक जमीनदोस्त झाल्याचे भीषण दृश्य पाहायला मिळत आहे. तर प्रामुख्याने कांदा, मक्याचे सर्वाधिक नुकसान झाले असून ज्वारी, मका, बाजरी, गहू, फळबागांनाही याचा मोठा फटका बसला आहे. रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस व गारपिटीने हिरावून घेतल्याने शेतकरी हताश झाला आहे. 

महसूल विभागाकडून पंचनामे करण्यास सुरवात 

जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने झोडपले. पारोळा तालुक्यातील ४० गावांना फटका बसला आहे. पारोळा तालुक्यात आमदारांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली. पारोळा शहरासह तालुक्यात वादळी पाऊस व गारपिटीने जबर तडाखा दिला. यात ज्वारी, मका, बाजरी, गहु, कांद्यासह फळबागांना मोठा फटका बसला असून महसूल विभागाकडून पंचनामे सुरू करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budget Plan: जिओनंतर 'या' कंपनीने दिला धक्का! लोकप्रिय आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन आता बंद

Zodiac signs' fate: ललिता पंचमीमुळे आजचे योग शुभ, जाणून घ्या कोणत्या राशींवर लाभ

Maharashtra Live News Update: पंढरपूरात अतिवृष्टीचा अंदाज, सीना नदीला पुन्हा पुराचा धोका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rainfall: नागरिकांनो सतर्क राहा! आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार, कोकण- विदर्भ अन् मराठवाड्यात जोरदार बॅटिंग

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून भाऊबीज गिफ्ट; २००० रुपये मिळणार

SCROLL FOR NEXT