Unseasonal Rain Saam tv
महाराष्ट्र

Unseasonal Rain : बेमोसमी पावसाचा कांद्याला फटका; वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने नुकसान

Jalgaon News : राज्यात ठिकठिकाणी मागील दोन- तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस होत आहे. वादळी वारा व गारपीट देखील होत असल्याने नुकसान होत आहे. प्रामुख्याने शेतात असलेल्या पिकांना याचा फटका बसत आहे

Rajesh Sonwane

जळगाव : राज्यात अवकाळी पावसाने थैमान मांडले आहे. वादळी वाऱ्यासह गारपीट व पाऊस होत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दरम्यान जळगाव शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे प्रामुख्याने कांद्याला मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

राज्यात ठिकठिकाणी मागील दोन- तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस होत आहे. वादळी वारा व गारपीट देखील होत असल्याने नुकसान होत आहे. प्रामुख्याने शेतात असलेल्या पिकांना याचा फटका बसत आहे. दोन दिवसांपासून राज्यातील जालना, बीड, अकोला, नंदुरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला आहेत. तर पुढील दोन- तीन दिवस अजून अवकाळीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

कांदा पिकाला फटका 

गिरणा परिसरातील वरखेडे, तिरपोळे, चाळीसगाव परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. वरखेडे येथे काही भागात अर्धा मिनिटे गारांचा पाऊस पडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पावसामुळे कांद्यांसह चवळी, ज्वारी, बाजरी, आंबा आदींचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.

नंदुरबार जिल्ह्यात वादळी वाऱ्याच थैमान
नंदुरबार जिल्ह्यात देखी काल मध्यरात्री वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे कैरीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेकडो हेक्टर वरील कैरीच नुकसान झाले असून खराब झालेल्या कैरीमुळे उत्पादन घटणार आहे. याच परिणाम कैरीपासून आमचुल तयार करण्याच्या उद्योगाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे शासनाला पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. 

उन्हाळी मूग, उडीद पिकांचे नुकसान
बुलढाणा
: बुलढाणा जिल्ह्यात काल मेहकर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तालुक्यातील  दुधा, रायपुर, ब्रम्हपुरी परिसरात ही गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे परिसरात असलेल्या उन्हाळी मूग, उडीद, भुईमूग पिकांचे मोठे नुकसान झाले. उन्हाळी मुगाचे पीक झोपले असून गारांचा फटका बसल्याने मुंगाचे शेंगा काळ्या पडत आहेत. परिणामी उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live Update: पवईत घराची भिंत कोसळली, १ जण गंभीर जखमी

Nitesh Rane : वाळू चोरणाऱ्यांचे हात तोडले पाहिजे; वाळू चोरीवरून मंत्री नितेश राणे आक्रमक

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला, कार डिव्हायडर तोडून ट्रकला धडकली, ६ मित्रांचा मृत्यू

Jalna : स्वातंत्र्यदिनी आंदोलन करणाऱ्याच्या कमरेत पोलीस अधिकाऱ्याने घातली लाथ, व्हिडीओ व्हायरल

Chanakya Niti : लग्नानंतर प्रेम कमी होऊ नये म्हणून हा गुपित मंत्र

SCROLL FOR NEXT