Unseasonal Rain Saam tv
महाराष्ट्र

Unseasonal Rain : अवकाळीचा फटका; जळगाव जिल्ह्यात १० हजार हेक्टर क्षेत्रावर नुकसान, मक्यासह केळी बागा उध्वस्त

Jalgaon News : मे महिन्याच्या अगदी सुरवातीपासून राज्यात वेगवेगळ्या भागात अवकाळी पाऊस होत आहे. यात वादळी वाऱ्याचा देखील तडाखा बसत आहे. सातत्याने होत असलेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

संजय महाजन

जळगाव : राज्यात होत असलेल्या अवकाळी पावसाने होत्याचे नव्हते केले आहे. यात जळगाव जिल्ह्यात मे महिन्याच्या सुरवातीपासून आतापर्यंत झालेल्या अवकाळी पावसामुळे तब्बल १० हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. यात सर्वाधिक फटका केळी व फळबागांना बसला असून नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाकडून करण्यात येत आहेत. 

मे महिन्याच्या अगदी सुरवातीपासून राज्यात वेगवेगळ्या भागात अवकाळी पाऊस होत आहे. यात वादळी वाऱ्याचा देखील तडाखा बसत आहे. सातत्याने होत असलेल्या पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यात मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यात तब्बल १० हजार हेक्टर हून अधिक पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाने दिली आहे. 

सर्वाधिक केळी बागांचे नुकसान 
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात एकूण १० हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. तर अवकाळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक साडेसहा हजार हेक्टरवर केळी पिकाचे तर त्या खालोखाल मका पिकाचे १ हजार हेक्टर, बाजरी पिकाचे ५०० एकर तर फळबागांचे १ हजार ९५० हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान मुक्ताईनगर, रावेर, धरणगाव, एरंडोल व बोदवड या तालुक्यांमध्ये झाले आहे. एकट्या रावेर तालुक्यात केळीचे तब्बल ४४७ हेक्टर एवढे नुकसान झाले आहे.

नुकसानीचे ६५ टक्के पंचनामे 

दरम्यान अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कुर्बान तडवी यांनी अधिकृत माहिती दिली असून आतापर्यंत नुकसानीचे तब्बल ६५ टक्के पंचनामे झाले असल्याचं त्यांनी सांगितले आहे. उर्वरित भागातील पंचनामे पूर्ण करून त्या संदर्भातील अहवाल शासनाकडे पाठविला जाणारा असून त्यानुसार त्यांच्या नुकसान भरपाईची प्रक्रिया केली जाणार असल्यासही कुर्बान तडवी यांनी सांगितलं. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update : मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु होणार, आज 'या' जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra News Live Update: आज दीड दिवसांच्या बाप्पांना आज निरोप दिला जाणार

Accident: भरधाव कंटेनर गणरायाच्या आगमन मिरवणुकीत घुसला, १४ जणांना चिरडलं; २ शेतकऱ्यांनी जागीच सोडले प्राण

Diabetes Diet : काळा की पिवळा, डायबिटीज रुग्णांनी कोणता गुळ खावा? शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी जाणून घ्या

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT