lightning strike Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: वीज कोसळून दोन महिला ठार; एक जखमी

वीज कोसळून दोन महिला ठार; एक जखमी

साम टिव्ही ब्युरो

यावल (जळगाव) : जिल्ह्यातील यावल, जामनेर तालुक्यातील काही भागात गुरुवारी (ता. २३) दुपारी वादळी पाऊस झाला. या पावसात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, नावरे (ता. यावल) व मांडवे बुद्रूक (ता. जामनेर) येथील वेगवेगळ्या घटनांत दुपारी शेतात काम करणाऱ्या दोन महिलांचा वीज अंगावर कोसळून मृत्यू (Death) झाला. तसेच अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले व वीज खांब वाकून तारा तुटून वीजपुरवठा खंडित झाला. काही ठिकाणी घरांचेही नुकसान झाले आहे. (jalgaon news Two women killed in lightning strike One injured)

नावरेतील महिला ठार

नावरे (ता.यावल) येथील रिनाबाई सुनील मेढे (वय ३९) या शेतात काम करीत (Jalgaon News) असताना त्यांच्या अंगावर गुरुवारी (ता.२३) दुपारी वादळी पाऊस सुरू असताना अचानक वीज कोसळली. यात रीना गंभीर जखमी झाल्या. त्यांना तत्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात (Hospital) दाखल केले. मात्र, तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. त्या नावरे ग्रामपंचायत सदस्य रेखा मेढे यांच्या भगिनी होत. विशेष म्हणजे, रीना मेढे यांच्या पतीचे गेल्या सहा महिन्यांपूर्वीच एका अपघातात (Accident) निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण नावरे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

माडवे येथे महिलेचा मृत्यू; एक जखमी

मांडवे बुद्रूक (ता.जामनेर) परिसरात जोरदार पाऊस सुरू झाल्याने शेतात मका लावण्याचे कामासाठी गेलेल्या हुजराबाई नब्बास तडवी (वय ४०) या लिंबाच्या झाडाचा सहारा घेण्यासाठी गेल्या असता झाडासह अंगावर वीज कोसळल्याने हुजराबाई जागीच ठार झाल्या. तर जवळच असलेले सुपडू पुंडलिक जाधव (वय ६०) हे जखमी झाले. त्यांना जामनेर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. दरम्यान, मृत हुजराबाई यांना दोन मुले आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य मेहमूद तडवी, पोलिस पाटील सागर जाधव यांनी मृत महिलेवर जामनेर सरकारी दवाखान्यात विच्छेदन करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Pakistan : टीम इंडियाची धमाकेदार सुरुवात; पहिल्या दोन षटकात पाकिस्तानचे दोन फलंदाज गारद

Crime: अरविंदचं तिसरं लग्न, नंदिनीचा पाचवा नवरा; भररस्त्यात डोक्यात गोळ्या झाडल्या, फेसबुकवर लाईव्ह करत...

Face Care: महागडे फेसवॉश वापरण्यापेक्षा या घरगुती सामग्रीने चेहरा धुण्यास करा सुरुवात, मिळेल सोफ्ट ग्लोईंग स्किन

Akola : मूकबधिर मुलीवर राहत्या घरात विनयभंग, तोंडावर रुमाल दाबून गळा दाबला; अकोल्यात भयकंर घडलं

MVP Annual Meeting: नाशिकमध्ये मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वार्षिक सभेत राडा|VIDEO

SCROLL FOR NEXT