Bribe Case Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Bribe Case: बदली आदेश स्थगिती चेकनेच घेतली लाच; मुख्याध्यापकासह संस्‍थाध्‍यक्ष, लिपिक ताब्‍यात

बदली आदेश स्थगिती चेकनेच घेतली लाच; मुख्याध्यापकासह संस्‍थाध्‍यक्ष, लिपिक ताब्‍यात

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : एरंडोलच्या एका शिक्षण संस्थेतून दुसऱ्या शिक्षण संस्थेत होणारी बदली थांबविण्यासाठी दोन शिक्षकांकडून चक्क धनादेशाने ७५ हजारांची लाच (Bribe) मागून अ‍ॅडव्हान्समध्ये (Jalgaon) धनादेश स्वीकारणाऱ्या संस्थाध्यक्षासह मुख्याध्यापक, वरिष्ठ लिपिकाला अटक करण्यात आली आहे. (Live Marathi News)

तक्रारदार शिक्षक हे श्री सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ, जळगाव संचालित महात्मा फुले हायस्कूल, एरंडोल येथे उपशिक्षक पदावर कार्यरत आहेत. या संस्थेने तक्रारदारांची व त्यांचे उपशिक्षक या पदावर कार्यरत मित्र अशा दोघा शिक्षकांची बदली १ एप्रिलला एरंडोल (Erandol) हायस्कूल येथून महात्मा फुले हायस्कूल, धरणगाव येथे केली. त्याबाबतच्या मंजुरीसाठीचा प्रस्ताव माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविला होता.

तक्रारदार यांची व त्यांचे सहकारी उपशिक्षक मित्र अशा दोघांची बदलीस स्थगिती मिळण्यासाठी व पाठवलेला मंजुरी प्रस्ताव रद्द करण्यात यावा, अशा आशयाचे संस्थेचे पत्र शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद जळगाव (Jalgaon ZP) यांचे नावे देण्याच्या मोबदल्यात मुख्याध्यापक विनोद शंकर जाधव (वय ४२) व लिपिक नरेंद्र उत्तम वाघ (वय ४४, रा. भडगाव) यांनी लाचेची मागणी केली.

संस्‍थाध्‍यक्षाकडून पुर्ण पगाराची मागणी

मुख्याध्यापक व लिपिकानंतर शिक्षण संस्थेचा अध्यक्ष विनोद पंढरीनाथ महाजन (वय ५६, रा. माळीवाडा, एरंडोल) यांच्यासाठी दोघा तक्रारदार शिक्षकांचा एक महिन्याचा पूर्ण पगार (प्रत्येकी ७५ हजार रुपये) हवा होता. तशी मागणीच बदली रद्द करण्यासाठी मुख्याध्यापक व लिपिकाने केली होती. त्यामुळे दोघा शिक्षकांनी लाचलुचपत विभागाशी संपर्क केला. त्यानुसार सापळा रचत अटक करण्यात आली.

लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्यासह पथकातील निरीक्षक एन. एन. जाधव, सुनील पाटील, रवींद्र घुगे, ईश्वर धनगर, सचिन चाटे अशांच्या पथकाने वेशांतर करत सापळा रचला. लाचेपोटी धनादेश स्वीकारताच मुख्याध्यापक विनोद शंकर जाधव, वरिष्ठ लिपिक नरेंद्र उत्तम वाघ याच्यासह संस्थेचे अध्यक्ष विजय पंढरीनाथ महाजन या तिघांना अटक करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ...यापुढे एकही चूक खपवून घेणार नाही, CM फडणवीसांनी मंत्र्यांना दिली तंबी

Prajakta Mali: 'एक नंबर तुझी कंबर...' प्राजक्ताच्या फोटोंनी वाढवला इंटरनेटचा पारा

Pune Flood : पुण्यात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती, नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ | VIDEO

Nachni Bhakri: नाचणीची भाकरी खाण्याचे हे आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Operation Sindoor : पाकिस्तानला क्लीन चीट देणारे आता पुरावे विचारतात; अमित शाहांचा काँग्रेसवर घणाघाती हल्ला|VIDEO

SCROLL FOR NEXT