Pachora News Saam tv
महाराष्ट्र

Pachora News : छतावरचे पाणी काढताना विद्युत तारांना स्पर्श; विजेच्या झटक्याने महिलेचा मृत्यू

Jalgaon News : दुर्गाबाई राठोड यांचे गावात घर असून या घराजवळ लाकडी खांब उभारून त्याला विद्युत वाहिनीच्या तारा महावितरणाने बांधल्या आहेत.

Rajesh Sonwane

पाचोरा (जळगाव) : पाऊस पडला असल्याने घराच्या छतावर पाणी साचलेले होते. हे पाणी काढण्यासाठी छतावर गेलेल्या महिलेचा विद्युत तारांचा स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची घटना पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे बुद्रुक येथे घडली. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पाचोरा (Pachora) तालुक्यातील वडगाव आंबे बु. येथील दुर्गाबाई नानू राठोड (वय ५०) असे सदरच्या घटनेत मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. दुर्गाबाई राठोड यांचे गावात घर असून या घराजवळ लाकडी खांब उभारून त्याला विद्युत वाहिनीच्या तारा महावितरणाने बांधल्या आहेत. दरम्यान १६ जुलैला दुर्गाबाई राठोड या दुपारी घराच्या छतावर जाऊन पावसाचे साचलेले पाणी काढण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांचा स्पर्श विद्युत वाहिनीच्या तारांचा झाला. यात त्यांना विजेचा जोरात झटका (Electric shock) बसल्याने त्या फेकल्या गेल्या. 

सदरची घटना कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, या घटनेमुळे ग्रामस्थ संताप झाले असून या घटनेला महावितरण कंपनी जबाबदार असून संबंधित महिलेच्या कुटुंबियांना मदत करण्याची मागणी केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune Train: पुणे-मुंबईकरांना मोठा दिलासा, १० दिवसांनतर रेल्वे रूळावर; कोणकोणत्या ट्रेन सुरू झाल्या?

Maharashtra News Live Update: पीकविमा अर्जातील नव्या हमीपत्रामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

Rain Update : राज्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; तुमच्या भागातील हवामानाचा अंदाज काय? वाचा

Satara Tourism : महाराष्ट्रातील 'मिनी काश्मीर' म्हणून ओळखलं जाणारं हे ठिकाण पाहिलं का? पावसाळ्यात दिसते अधिकच सुंदर

Akshay Kumar : अक्षय कुमारचे भीतीदायक हास्य तर सैफ अली खानच्या डोळ्यात आग; 'हैवान'चा फर्स्ट लूक आऊट, रिलीज डेट काय?

SCROLL FOR NEXT