st strike saam tv
महाराष्ट्र

St Strike: संपाचे तीन महिने.. ५८७ कर्मचाऱ्यांच्या सेवेला ब्रेक, ७५ कोटींचे नुकसान

संपाचे तीन महिने.. ५८७ कर्मचाऱ्यांच्या सेवेला ब्रेक, जळगाव विभागाचे ७५ कोटींचे नुकसान

संजय महाजन

जळगाव : विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला तीन महिने पूर्ण झाले. संपामुळे महामंडळाच्या जळगाव विभागाचे ७५ कोटींपर्यंत आर्थिक नुकसान झाले आहे. तर या तीन महिन्‍यात विभागातील ५८७ कर्मचाऱ्यांच्‍या सेवेला ब्रेक लागला आहे. (Three months of st strike Break service 587 employees loss of 75 crore to Jalgaon division)

राज्‍य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व इतर लाभ मिळावा; याकरिता महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ७ नोव्हेंबरपासून बेमुदत (St Strike) संपावर आहेत. या आंदोलनाला आता तीन महिने पूर्ण होत असून, काही कर्मचारी अद्याप कामावर (Jalgaon News) रुजू झालेले नाहीत. यामुळे महामंडळातील कर्मचारी संपावर असल्‍याने बस फेरी देखील होत नाहीत.

कोरोनानंतर संपाचा फटका

कर्मचारी आंदोलनातून मागे हटण्यास तयार नाही. याचा सर्वाधिक परिणाम महामंडळाच्‍या उत्‍पन्‍नावर होत आहे. कोरोनामुळे आधीच तोट्यात गेलेले महामंडळ संपामुळे अधिकच तोट्यात गेले. संपामुळे जळगाव (Jalgaon) विभागाचे सुमारे ७५ कोटी रूपयांचे उत्पन्न बुडाले आहे.

१८४ कर्मचारी बडतर्फ

कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना विरोध करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महामंडळातर्फे कारवाई मोहीम सुरू केली आहे. नोटीसनंतर कारवाई होत असताना देखील कर्मचारी रूजू होत नाही. यामुळे आतापर्यंत ४०३ कर्मचाऱ्यांचे निलंबन, तर १८४ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT