महाराष्ट्र

तीन दिवसाचे अर्भक आढळले कुजलेल्या स्थितीत

Rajesh Sonwane

जळग‍ाव : शौचालयाचे बांधकाम सुरू असतांना नवजात बालकाचे अर्भक कुजलेल्या स्थितीत आढळून आले. हे अर्भक दोन- तीन दिवसाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. (The three-day-old infant was found in a decomposed state)

जळगाव शहरातील खंडेरावनगर परिसरात सदरचा प्रकार उघड झाला आहे. शौचालयाचे बांधकाम सुरू असतांना आज दुपारी एकच्या सुमारास दोन ते तीन दिवसांचे नवजात बालकाचे अर्भक कुजलेल्या अवस्थेत मिळून आले आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

खंडेरावनगरात एका घरात शेख इरफान शेख पिंजारी हे भाड़ेकरु म्हणून राहतात. घराचे पक्के बांधकाम सुरू असून याठिकाणी शौचालयाचे बांधकाम सुरू असल्याने कामगारांनी पत्र लावण्याचे काम पूर्ण केले.

प्लास्टिकच्या गोणीत होते अर्भक

आज सकाळी दुर्गंधी सुटल्याने परिसरातील नागरिकांनी येथे पाहणी केली असता शौचालयाचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी प्लास्टिकच्या गोणीत नवजात बालक कुजलेल्या स्थितीत आढळून आले. नागरिकांनी रामानंदनगर पोलिसांना प्रकाराबाबत माहिती दिली. यानंतर रामानंदनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विजय शिंदे, पोलिस उपनिरीक्षक गोपाळ देशमुख यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी अर्भक जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. मध्यरात्री कुणीतरी अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी हे अर्भक ठेवले असल्याची माहिती मिळाली असुन याप्रकरणी रामानंदनगर पाेलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू अाहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: राज्यातील १३ जागांवर ठाकरे गटविरुद्ध शिवसेना,तर १५ जागेवर काँग्रेसची भाजपशी लढत

Chanakya Niti: यश प्राप्त करायचंय? चाणक्याची ही रणनिती लक्षात ठेवा

Amitabh Bachchan: कोस्टल रोड, अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट; भाजप अन् आदित्य ठाकरेंमध्ये रंगलं ट्विट वॉर

Investment Tips: गुंतवणूक करताना 'या' गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

Waris Pathan : मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट ; वारीस पठाण निवडणुकीच्या रिंगणात, लढत तिरंगी होणार

SCROLL FOR NEXT