Bhadgaon Panchayat Samiti saam tv
महाराष्ट्र

भडगाव पंचायत समितीच्या निवासस्थानातून फाईलींची चोरी

साम टिव्ही ब्युरो

भडगाव (जळगाव) : येथील पंचायत समितीच्या शासकीय निवासस्थानातून शासकीय फाईल अन् दस्तऐवज चोरीला गेल्याची घटना घडली. याबाबत भडगाव पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (jalgaon news Theft of files from the residence of Bhadgaon Panchayat Samiti)

भडगाव (Bhadgaon) पंचायत समितीच्या आवारातील निवासस्थान क्रमांक तीनमधून शौचालय प्रस्तावांसह फाईल व मग्रारोहयो योजनेचे शासकीय दप्तर, दस्तऐवज, मस्टर मागणी व मस्टर, कोरे रजिष्टर, फाईल अज्ञात चोरट्यानी चोरून (Theft) नेल्याची तक्रार करण्यात आली आहे. ही घटना २४ नोव्हेंबर २०२१ ते १३ जानेवारी २०२२ दरम्यान घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मागच्‍या दरवाज्‍यातून प्रवेश

सन २०२०-२१ पर्यंतचे शौचालय प्रस्तांवासह फाईल व मग्रारोहयो योजनेचे शासकीय दप्तर, दस्तऐवज मस्टर मागणी व मस्टर, कोरे रजिष्टर, फाईल अज्ञात व्यक्तीने शासकीय निवासस्थानाचे मागील दरवाजा तोडून अनाधिकारी प्रवेश करुन संमती शिवाय व लबाडीच्या इराद्याने चोरुन नेले. याप्रकरणी भडगाव पंचायत समितीचे (Bhadgaon Panchayat Samiti) सहाय्यक अधिकारी रवींद्र जगताप यांनी दिलेल्या तक्रारीवरून भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस कर्मचारी विलास पाटील करीत आहेत. दरम्यान. आण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार समीतीचे विजय पाटील यांनी शौचालयात गैरव्यवहाराची तक्रार केली आहे. आता त्यात दप्तरच चोरीला गेले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अंतराळात स्पेससूट शिवाय किती वेळ व्यक्ती जिवंत राहू शकतो?

Lucknow Accident: सुसाट कार, मद्यधुंद चालक... ५ जणांना चिरडले, अनेक वाहनांना उडवले; भयंकर अपघाताचा VIDEO

Maharashtra News Live Updates : साखर कारखाना गाळप हंगामसंदर्भात मंत्री समितीची बैठक दुपारी 4 वाजता

IND vs BAN: इथे लावा एक फिल्डर...; ऋषभ पंतने सेट केली बांगलादेशाच्या टीमची फिल्डींग, Video Viral

Maratha Reservation : मनोज जरांगे यांची ईडी चौकशी करा, खोक्यांचा व्यवहार झालाय; कुणी केली मागणी? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT