Surabhi Jayashree Jagdish
जिऱ्याचं पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. जाणून घेऊया रिकाम्या पोटी ते पिण्याने काय होतं हे जाणून घेऊया
रिकाम्या पोटी जिऱ्याचं पाणी प्यायल्याने पचनसंस्था मजबूत होते आणि गॅस, अपचन, आम्लता आणि पोट फुगणं यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
जिऱ्याचं पाणी चयापचय योग्य पद्धतीने करतं आणि भूक नियंत्रित करण्यास देखील मदत करते, ज्यामुळे वजन कमी होते.
जिऱ्याचे पाणी पिण्यामुळे मधुमेह देखील नियंत्रित होतो. ते इन्सुलिन संवेदनशीलता सुधारून रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते.
जिऱ्याचे पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. ज्यामुळे यकृत आणि किडनी विषारी पदार्थ बाहेर काढतात.
जिऱ्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे अ, क आणि ई भरपूर प्रमाणात असतात जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.
उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी, ते रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करू शकते.