Temperature Saam tv
महाराष्ट्र

उष्णतेची तिव्रता वाढली; सावधानतेचा इशारा

उष्णतेची तिव्रता वाढली; सावधानतेचा इशारा

संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव

जळगाव : जिल्ह्यात तीन दिवस उष्णतेची लाटेचा अंदाज वर्तविला आहे. त्‍यानुसान दोन दिवसांपासून जिल्ह्यात तापमानाचा पार वाढला असून सकाळपासूनच उष्‍णता जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने उष्माघातापासून बचाव व उपायासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. (jalgaon news The intensity of the heat increased)

उष्णतेच्या लाटेत उष्माघाताचा घटना टाळण्यासाठी (Jalgaon News) जिल्हा प्रशासन, पालिका प्रशासन व आरोग्य विभागात देखील सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी अभिजित राऊत यांनी दिल्या आहेत. तर लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांना देखील उष्णतेच्या लाटेत उपायोजना राबवण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने केले आहे. यातच उष्‍माघाताने मंगळवारी एकाचा मृत्‍यू (Death) झाल्‍याने अधिक सतर्क झाले आहेत.

जिल्‍हाधिकारींचे आवाहन

उन्‍हाची तिव्रता अधिक असल्‍याने पुढील काही दिवस उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी वारंवार पाणी पिणे, अनावश्यकपणे घराच्या बाहेर न पडणे, लहान मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे असून जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात (Hospital) सर्व डॉक्टरांना सतर्क राहण्याचे सूचनाही देण्यात आल्या आहेत. सर्वांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी; असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : महाराष्ट्रात भाजपकडून एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न - महेश गायकवाड

Prajakta Mali Farmhouse: निसर्गाच्या सानिध्यात वसलंय प्राजक्ताचं सुंदर 'प्राजक्तकुंज'; फार्महाउसचं एका दिवसाचं भाडं किती?

Viral Video: रिल्सच्या नादात जीवाशी खेळ, उंच पुलावरून चालत चालत निघाला, मग पुढे काय झालं तुम्हीच पाहा

IPL 2025 Mega Auction: इटलीचा हा स्टार IPL ऑक्शन गाजवणार! मुंबई इंडियन्ससोबत आहे खास कनेक्शन

Tanaji Sawant : विकास न झालेलं गाव दाखवा आणि १ लाख मिळवा, तानाजी सावंतांचे मतदारांना चॅलेंज!

SCROLL FOR NEXT