Chopda Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Chopda Vidhan Sabha : चोपड्यात ठाकरे गटाने बदलला उमेदवार; प्रभाकर सोनवणे यांना उमेदवारी

Jalgaon News : ठाकरे गटाकडून ऐनवेळी उमेदवार कोणत्या कारणामुळे बदलविण्यात आला हे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

संजय महाजन

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाला सुटला आहे. त्यानुसार उमेदवार जाहीर झाल्यानंतर ऐनवेळेस ठाकरे गटाकडून उमेदवार बदलवून भाजपमधून आलेले प्रभाकर सोनवणे यांना आता उमेदवारी देण्यात आली आहे. 

विधानसभेच्या चोपडा (Chopda) मतदारसंघात महा विकास आघाडीचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे गटाकडून राजू तडवी यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा एक दिवस बाकी असतानाच ही उमेदवारी आता प्रभाकर सोनवणे यांना देण्यात आल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे. (Shiv Sena) दरम्यान ठाकरे गटाकडून ऐनवेळी उमेदवार कोणत्या कारणामुळे बदलविण्यात आला हे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

दोन्ही सोनवणे आमने सामने 

चोपडा मतदार संघात मागील काळात लता सोनवणे या आमदार होत्या. यावेळी देखील महायुतीत हि जागा शिवसेना शिंदे गटाला सुटल्याने आता त्यांचे पती प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना महायुती कडून उमेदवारी देण्यात आली आहे. आता त्यांच्या विरोधात प्रभाकर सोनवणे उमेदवार असल्याने प्रभाकर सोनवणे हे कशी लढत देतात? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT