Jalgaon News Tapi River Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: तापीला पूर, तरीही बोटीतून जीवघेणा प्रवास!

तापीला पूर, तरीही बोटीतून जीवघेणा प्रवास!

Rajesh Sonwane

जळगाव : चोपडा जाण्यासाठी खेडीभोकरी ते भोकर या दरम्यान तापी नदीवरील हंगामी लाकडी पूल पावसाळ्यात म्हणजे जूनपासून सहा महिन्यांसाठी वाहतुकीसाठी बंद होतो. दरम्‍यान हतनूर धरण (Hatnur Dam) पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस (Heavy Rain) आल्‍याने तापी नदीला मागील महिन्यात मोठा पूर येऊन गेला आहे. आता देखील पुराचे पाणी पूर्णतः कमी झालेले नाही. तरी देखील तापी नदीतून (Tapi River) बोटीवर प्रवाशांसोबत दुचाकी उभ्या करून जीवघेणा प्रवास केला जात आहे. यात काही दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्नदेखील यामुळे निर्माण होत आहे. (Jalgaon News Tapi River Flood)

जळगाव (Jalgaon) तालुक्‍यातील भोकर आणि चोपडा तालुक्‍यातील खेडीभोकरी या दोन गावांना जोडण्यासाठी तापी नदीवर ब्रिटिशकालीन हंगामी लाकडी पूल टाकण्यात येत असतो. या पुलाचा वापर (Chopda) चोपडा, जळगाव, धरणगाव, एरंडोल (Erandol) या तालुक्‍यात जाण्यासाठी कमी अंतराचा व सोयीचा ठरतो. यामुळे पुलावरून होणारी रहदारी ही बरीच आहे.

नदीला पूर असताना बोटीतून प्रवास

जानेवारी– फेब्रुवारीपासून नदीवर पूल टाकून तो साधारण ३१ मेपर्यंत रहदारीसाठी वापरला जातो. पावसाळ्यात मात्र हा पूल काढून टाकला जात असला तरी एका बाजूने नदीच्या दुसऱ्या काठावर सोडण्यासाठी बोटींचा वापर केला जात आहे. मात्र या बोटींमधून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचा अनुभव येथून जाणाऱ्या प्रत्येकाला येत आहे. मुळात बोटीतून प्रवास करताना बोट उलटल्‍याच्‍या दुर्घटना घडल्या आहेत. तरी देखील हा जीवघेणा प्रवास तापी नदीतून सुरू आहे.

बोटीत गाडी अन्‌ नागरिकही

खेडीभोकरीच्या पायथ्याशी बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. मुळात बोटींमधून नागरिकांना एका काठावरून दुसऱ्या काठावर नेण्याचे काम करणे अपेक्षित आहे. परंतु नागरिकांसोबत दुचाकी देखील ठेवल्या जात आहेत. एका कोटीवर आठ- दहा दुचाकी ठेवून नागरिकांना बसविले जाते. यामुळे नागरिक आणि दुचाकी अशा वाहतुकीत काही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? हा प्रश्‍न समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT