Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: उन्हाचा परिणाम; ११५ टक्के पाऊस तरीही तीन गावांना टँकरने पाणी

उन्हाचा परिणाम; ११५ टक्के पाऊस तरीही तीन गावांना टँकरने पाणी

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : यंदा पावसाळ्यात अनेक वेळा अतिवृष्टी झाली. धरणे ओव्हरफ्लो वाहिली. नद्या, नाले ओसंडून वाहिली. काही गावात अद्यापही नद्यांना पाणी आहे. पावसाळ्यात ११५ टक्के पाऊस पडल्याची नोंद आहे. असे असताना जिल्ह्यात चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यात दोन टँकर तर कंडारी (ता. भुसावळ) येथे एक असे तीन टँकर सुरू करण्यात आले आहेत. कडाक्याच्या उन्हामुळे पाणीटंचाई सुरू झाल्याचे (Jalgaon News) सांगण्यात येत आहे. (jalgaon news Tanker water to three villages despite after 115 percent rain)

जिल्हा प्रशासनानेही यंदा पाणीटंचाई जाणवणार नसल्याचे गृहित धरले होते. असे असले तरी एनवेळी टंचाई जाणवलीच तर पंचायत नको म्हणून २०२१-२२ या टंचाई कालावधीत ५०५ गावांकरिता ३ कोटी ११ लाख रुपयांचा संभाव्य कृती पाणीटंचाई आराखडा तयार केला आहे. एकूण १६ गावात विहीर अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यात (Jamner) जामनेरला सहा, एरंडोलला दोन, (Bhusawal) भुसावळला दोन, मुक्ताईनगर एक, चाळीसगाव दोन, भडगाव दोन, पारोळा एक या गावांचा सामावेश आहे. चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव, हातगाव या २ गावांना टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर कंडारी (ता. भुसावळ) येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Arya Encounter Mystery: रोहित आर्यचा एन्काऊंटर की हत्या? रोहितच्या वकिलाच्या दाव्यानं खळबळ

Sikandar Shaikh Arrest: पहिलवान सिकंदर शेखला अटक; पोलिसांच्या कारवाईने कुस्ती क्षेत्रात खळबळ|VIDEO

Mumbai Crime : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; बीएमसी अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची धडक, 7 वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला चारली धूळ

Crime News : आई की कसाई? बॉयफ्रेंडसाठी एकुलत्या एक मुलाची हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT