st strike 
महाराष्ट्र

जळगावात एसटी कर्मचारी ठाम; वीस कर्मचाऱ्यांची केली सेवा समाप्‍ती

जळगावात एसटी कर्मचारी ठाम; वीस कर्मचाऱ्यांची केली सेवा समाप्‍ती

Rajesh Sonwane

जळगाव : राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या कर्मचाऱ्यांचा गेल्‍या महिनाभरापासून संप सुरू आहे. आपल्‍या मागणीवर ठाम असून जळगाव (Jalgaon) जिल्‍ह्यात एक देखील नवीन एसटी कर्मचारी कामावर रूजू झालेला नाही. कर्मचारी ठाम असून आंदोलनाला बसले आहेत. (jalgaon-news-st-strike-in-jalgaon-Termination-of-service-of-20-employees)

एसटीचे शासन सेवेत विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत; परंतु राज्‍य शासन व प्रशासनाकडून संपकरी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. तरी देखील कर्मचारी संपावरून मागे हटत नाही. यातच संपकाळात निलंबनाची कारवाई झालेले कर्मचारी आजपर्यत (ता. १३) रूजू झाल्यास निलंबन मागे घेण्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली होती. मात्र याला जळगाव जिल्‍ह्यातील कर्मचारींनी प्रतिसाद न देता संपावर ठाम राहिले.

२० कर्मचारींची सेवा समाप्‍ती

संपावर तोडगा म्‍हणून सरकारने पगारवाढीचा निर्णय घेतला. हा निर्णय मान्‍य नसल्‍याचे सांगत कर्मचारी संपावर ठाम राहिले. यामुळे शासनाच्या आदेशानुसार संपात सहभागी कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात येत आहे. यात कामावर रुजू होत नसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन तसेच बदलीची कारवाई केली. शिवाय परिवहन मंत्री परब यांनी आज अखेरची संधी दिली होती. यानंतर देखील कामावर न आलेल्‍या कर्मचारींची सेवासमाप्‍तीचे आदेश होते. त्‍यानुसार जळगाव आगारातून आज २० कर्मचाऱ्यांची सेवा समाप्‍त केली आहे.

नवीन बसफेरी नाहीच

जळगाव जिल्ह्यात एकूण कार्यरत चार हजार ४४२ कर्मचारी संपावर आहेत. निलंबनाच्या कारवाईच्या भीतीने काही जळगाव जिल्‍ह्यातील ४१७ कर्मचारी कामावर रुजू झाले होते. यामुळे काही अंशी बससेवा सुरू झाली होती. मात्र यानंतर सेवा पुन्‍हा विस्‍कळीत झाली. आज काही कर्मचारी रूजू होवून सेवा सुरू होणे अपेक्षित होते. मात्र एक देखील कर्मचारी रूजू न झाल्‍याने जळगाव जिल्‍ह्यातून नवीन बसफेरी झाली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court: चुकीच्या वक्तव्याची तुलना द्वेषपूर्ण भाषणाशी होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले

Numerology: या तारखेला जन्मलेल्या व्यक्ती असतात लकी; प्रेमात अन् करिअरमध्ये मिळते यश

Maharashtra News Live Updates: तासगावमध्ये शरद पवारांची सभा, अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेणार का?

Gold Price Today: 5000 हजारांनी स्वस्त झाल्यानंतर सोन्याचे भाव वाढले; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Devendra Fadanvis : मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, पाहा Video

SCROLL FOR NEXT