st strike
st strike 
महाराष्ट्र

संपाचे सदाभाऊ व पडळकरांना विचारा; मंत्री गुलाबराव पाटील यांचा टोला

संजय महाजन

जळगाव : एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. पगारवाढीचा विषय मान्‍य करून संप मागे घ्यायला हवा. परंतु, विलनीकरणाच्‍या मागणीवर ठाम राहून कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. एसटी कर्मचारी संप मागे का घेत नाही? याबाबत सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) व गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) यांना विचारले तर एका मिनिटात उत्‍तर मिळेल; असा खोचक टोला पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला.

संविधान दिनानिमित्‍ताने आयोजित कार्यक्रमानंतर मंत्री पाटील यांनी माध्‍यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. मंत्री पाटील म्‍हणाले, की एसटी कर्मचाऱ्यांच्या काही गोष्टी शासनाने मान्य केल्या असून काही मागण्या मान्य करण्यासाठी वेळ द्यावा लागेल. त्यातच कर्मचाऱ्यांच्या पगाराची देखील मोठी वाढ झाली असून कर्मचाऱ्यांनी त्यांचा संप मागे घ्यावा आणि लोकांचे होणाऱे हाल थांबवावे; असे मत त्‍यांनी मांडले.

आमदारांकडे लायसन आहे; माहित नाही

कन्‍नड घाटात पोलिस ट्रक चालकांकडून पैसे घेत असल्‍याबाबत आमदार मंगेश चव्‍हाण यांनी स्‍वतः ट्रक चालवत स्‍टींग केले. याबाबत मंत्री पाटील यांना विचारले असता ते म्‍हणाले, की आमदार चव्‍हाण यांनी ट्रक चालविली हे पाहिले. परंतु त्‍यांच्‍याकडे लायसन आहे की नाही हे माहित नाही. परंतु, अशा प्रकारे ट्रक चालकांकडून पैसे घेणाऱ्या पोलिसांवर कारवाई होईल; याबाबत पोलिस अधिक्षकांना आदेश दिले असल्‍याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : अधिकृत उमेदवार म्हणून मी अर्ज भरलाय , माघार घेणार नाही; वैशाली दरेकर यांचा निर्धार

Google Audio Emoji: फोनवर बोलणं होईल आणखी मजेशीर, गुगलने आणलंय नवीन ऑडिओ इमोजी फीचर; कसा करायचा वापर?

Spruha Joshi : स्पृहा जोशीचं बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण, 'या' वेबसीरीजमध्ये साकारली प्रमुख भूमिका

Narayan Rane : सत्ता गेल्याने त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय; नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

MI vs KKR, Toss Prediction: टॉस ठरेल बॉस! KKR ला हरवण्यासाठी मुंबईने आधी काय करावं?

SCROLL FOR NEXT