निलंबित 
महाराष्ट्र

जळगाव आगाराचे सोळा कर्मचारी निलंबित

जळगाव आगाराचे सोळा कर्मचारी निलंबित

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : एसटी कर्मचाऱ्यांचा संप सातव्या दिवशीही सुरूच आहे. दरम्यान, कामावर येण्याचे आदेश देवूनही जळगाव आगारातील सोळा कर्मचारी कामावर रुजू न झाल्याने त्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती एसटी प्रशासनाच्या सूत्रांनी दिली. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण कायम आहे. (jalgaon-news-Sixteen-st-employees-of-Jalgaon-depot-suspended)

तुटपुंज्या पगारावर परिवाराचा उदरनिर्वाह भागत नाही. महाराष्ट्र शासनाने एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन अदा करावे, शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये विलीनीकरण करून न्याय द्यावा; याप्रमुख मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी एकजुटीने काम बंद आंदोलन सुरू केले आहे. शनिवारी (ता. १३) एसटी महामंडळाच्‍या कर्मचाऱ्यांसोबत त्यांच्या कुटुंबीयांनीही आंदोलन सुरू केले ते आजही सूरूच होते. आतापर्यंत जळगाव एसटी आगाराचे चौदा कोटींपेक्षा अधिकचे उत्पन्न बुडाले आहे.

आंदोलनाला लोक संघर्ष मोर्चाने पाठिंबा दिला आहे. मोर्चाचे सचिन धांडे, पियुष पाटील, भरत कर्डिले, प्रमोद पाटील, कलिंदर तडवी, मुकेश सावकारे, दामोदर भारंबे, सागर पाटील, राहुल पावरा, अजय पावरा, असोदाचे चित्रनीश पाटील, सचिन माळी, सुमित साळुंखे, कानळदा सरपंच पुंडलिक सपकाळे, प्रमोद चव्हाण, किशोर सपकाळे उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूर शहरातील काही भागात पावसाच्या सरी

370 Biryani Controversy: 'व्यक्ती बदलतात, वाद बदलतात, पण प्रेक्षक...'; 370 बिर्याणी वादावर अंकिता वालावलकरनं नेटकऱ्यांना सुनावलं

ममता बॅनर्जींच्या अडचणी वाढल्या; गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल; पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

मुख्याध्यापकानं आधी दोन मुलं,पत्नीला मारलं नंतर स्वतः केली आत्महत्या; सोलापुरातील धक्कादायक घटना

Smriti Irani : मतदार यादीतून स्मृती इराणींचं नाव गायब, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT