महाराष्ट्र

शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह..शिरूडची शाळा सोमवारपर्यंत बंद

शिक्षक पॉझिटिव्ह..शिरूडची शाळा सोमवारपर्यंत बंद

Rajesh Sonwane

अमळनेर : शिरूड (ता. अमळनेर) येथील माध्यमिक शाळेतील एक शिक्षक पॉझिटिव्ह आल्याने सोमवारपर्यंत शाळा बंद ठेवण्यात आली आहे. संबंधीत शिक्षकाच्‍या चार दिवस संपर्कात आलेल्या सर्व विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांची अँटीजन चाचणी निगेटिव्ह आली आहे. काही जणांचा आरटीपीसीआर अहवाल प्रलंबित आहे. (jalgaon-news-shirud-village-school-teacher-corona-positive-and-school-closed)

शिरूड येथे कोरोना चाचणीचा कॅम्प घेण्यात आला होता. त्यात अमळनेरचे रहिवासी असलेले शिक्षक दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांना कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. मात्र आधी पॉझिटिव्ह आल्याने शिक्षकाचे लसीकरण झालेले नाही. संबंधित शिक्षकाने २४ तारखेला आरटीपीसीआर चाचणी केली असतांना त्याचा अहवाल २८ जुलैला प्राप्त झाला. यात ते पॉझिटीव्‍ह आढळून आले आहेत.

‘आरटीपीसीआर’चा अहवाल प्रलंबित

शिरूड येथील माध्यमिक विद्यालयातील शिक्षक पॉझिटिव्ह येताच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी यांच्या आदेशाने जानवे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अतुल चौधरी यांनी पथकासह शाळेतील ३५ विद्यार्थी आणि १२ कर्मचारी यांची अँटीजन व आरटीपीसीआर अशा चाचण्या करून घेतल्या. त्यात सर्वांची अँटीजन निगेटिव्ह आली आहे. तर आरटीपीसीआर अहवाल प्रलंबित आहे.

शाळा सॅनिटाईझ

शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र शिंदे यांनी तातडीने शाळा सॅनिटाईझ करून घेतली आहे. तर शिक्षक राहत असलेल्या धुळे रोड परिसरातील शिक्षकांच्या हाय रिस्क संपर्कातील १०२ जणांची अँटीजन निगेटिव्ह आली आहे. २१ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली तो अहवाल प्रलंबित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डायबिटिस पेशंटसाठी 10 नैसर्गिक उपाय, हे पदार्थ खा ब्लड शुगर राहील कंट्रोलमध्ये

Accident News : देवीच्या मंदिराबाहेर भयंकर घडलं! भरधाव कारची भाविकांना धडक; ३ जणांचा जागीच मृत्यू

White vs Yellow Ghee : पांढरे की पिवळे तूप? आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय? रोज खाण्यापूर्वी जाणून घ्या

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Vastu Tips: महिन्याच्या शेवटी खिशात पैसा राहात नाही? आजच करा हे ५ सोपे उपाय; कधीही भासणार नाही पैशांची चणचण

SCROLL FOR NEXT