MSRTC Bus Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: शालेय विद्यार्थ्यांना बनावट पासची विक्री; पोलिसात गुन्‍हा दाखल

शालेय विद्यार्थ्यांना बनावट पासची विक्री; पोलिसात गुन्‍हा दाखल

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाची सवलतीची पास दिली जात असते. परंतु, बनावट पासची विक्री करून फसवणूक केल्‍याचा प्रकार प्रकार नशिराबाद- बेळी मार्गावर जळगाव (Jalgaon) आगाराच्या बसमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalgaon News St Bus Student Pass)

राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या (MSRTC) जळगाव आगाराचे वाहक विनोद पाटील हे नशिराबाद मार्गावर ड्युटीवर होते. या दरम्‍यान एका विद्यार्थ्याच्या पासबाबत शंका आल्याने त्यांनी या विद्यार्थ्याला (Student) जळगाव आगारात आणले. तेथे पासची पडताळणी केली असता या पासबाबत नोंदच नसल्‍याचे समोर आले. हा पास बाहेरुन बनविला असून तो मित्र माझ्यासोबतच शिक्षण घेत असल्याचे सदर मुलाने सांगितले.

झेरॉक्‍स दुकानातून पासची विक्री

मुलाने दिलेल्‍या माहितीनुसार वाहकाने जिल्हा पेठ पोलीस ठाणे गाठून निरीक्षक अरुण धनवडे यांची भेट घेऊन माहिती दिली. यानंतर तपास केला असता हा पास जळगाव शहरातील आंबेडकर मार्केट येथील दुकानातून विक्री होत असल्याचे उघड झाले आहे. याबाबत जिल्‍हा पेठ पोलिस स्‍टेशनला गुन्‍हा दाखल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: MPSC पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार; जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा

Heart Attack : दिवसातील 'ही' १० मिनिटे ठरू शकतात धोकादायक, वाढतो हार्ट अटॅकचा धोका

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! १,८००० रुपये बोनस आणि DAच्या निर्णयाने खात्यात जमा होणार बंपर रक्कम?

Walking Benefits for Weight Loss: रोज 30 मिनिटे चालण्याने महिनाभरात खरोखरच वजन कमी होते का? जाणून घ्या

Political News : ठाकरेसेनेकडून ४० लोकसभा मतदार संघांसाठी संपर्कप्रमुख जाहीर, कुणाकुणाला संधी?, पाहा संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT