Amalner Accident Saam tv
महाराष्ट्र

Amalner Accident: उभ्या ट्रॅक्टरला मागून धडक; अपघातात पती- पत्नीचा मृत्यू

Jalgaon News : सायंकाळी गावाकडे परत येत असताना सप्तशृंगी मंदिराजवळ उभे असलेले ट्रॅक्टर दिसले नाही. यामुळे ट्रॅक्टरला मागून दुचाकीची धडक लागली.

Rajesh Sonwane

अमळनेर (जळगाव) : रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला दुचाकीने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला. सदर घटना अमळनेर (Amalner) तालुक्यातील गांधली रस्त्यावर सप्तशृंगी मंदिराजवळ (Accident) घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. (Live Marathi News)

अमळनेर तालुक्यातील पिळोदा येथील युवराज दयाराम पाटील (वय ६२) हे पत्नी मंगलबाई युवराज पाटील (वय ५५) हे दुचाकीने पारोळा येथे गेले होते. (Jalgaon) सायंकाळी गावाकडे परत येत असताना सप्तशृंगी मंदिराजवळ उभे असलेले ट्रॅक्टर दिसले नाही. यामुळे ट्रॅक्टरला मागून दुचाकीची धडक लागली. त्यात युवराज पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर मंगलबाई या जखमी झाल्या होत्या. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जखमी झालेल्या मंगलाबाई यांना तातडीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र काही वेळातच उपचार घेताना त्यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात भाऊ व दोन मुली आहेत. दरम्यान अमळनेर पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांच्या मृत्यू प्रकरणी अंमळनेर पोलीस स्टेशनला चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

Sushil Kedia: मराठी भाषेवरून व्यावसायिकानं राज ठाकरेंना डिवचलं; ५ तारखेनंतर करेक्ट कार्यक्रम करणार, मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

SCROLL FOR NEXT